Car Average : काय सांगता..! अ‍ॅव्हरेज मिळत नाही? तर मग फॉलो करा ‘या’ टिप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Average : अनेकांना कार खूप वेगात चालवण्याची सवय असते. त्यामुळे कधी कधी कारवरील पूर्ण नियंत्रण जाते. अनेकदा नियंत्रण गेल्यामुळे अपघात होतात. यात काहीजणांना आपले प्राण गमवावे लागतात. कारचा स्पीड जास्त ठेवला तर त्याचे इतरही गंभीर परिणाम भोगावे लागतात.

यातील एक म्हणजे कारचालकांना अ‍ॅव्हरेज मिळत नाही. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर काळजी करू नका, तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला अ‍ॅव्हरेज मिळेल. तसेच तुमचे आर्थिक नुकसानही वाचू शकते.

गाडीचा वेग जास्त असेल तर कमी होते अ‍ॅव्हरेज

कार नेहमी हळू चालवावी. कारण कार वेगात असेल तर अ‍ॅव्हरेज कमी होते. कार जास्त वेगाने चालवली तर इंजिनमधून जास्त पॉवर लागते. त्यामुळे जर अधिक ऊर्जा पाहिजे असेल तर, इंजिनला अधिक वेगाने सतत काम करावे लागते आणि साहजिकच यासाठी जास्त इंधन लागते. जास्त इंधन वापरले तर कारचे अ‍ॅव्हरेज कमी होते.

हा असावा वेग

जर तुम्हाला चांगले अ‍ॅव्हरेज मिळवायचे असेल, तर महामार्गावर कारचा वेग 80 किमी प्रतितास पेक्षा जास्त ठेवू नका. हे लक्षात घ्या की हा वेग पाच गीअर्स असलेल्या कारसाठी ठीक आहे. 100 किमी प्रतितास वेगाने सहा किंवा त्याहून अधिक गीअर्स असलेल्या कार चालवल्यास चांगले अ‍ॅव्हरेज मिळते.

सध्या कारमध्ये RPM मीटर मिळत आहे. त्यामुळे कार चालवत असताना तुमच्या कारचा RPM जरी दोन ते तीनच्या दरम्यान ठेवला तरी वेग कायम राहतो तसेच इंधनाचा वापर कमी होतो.

आहेत अनेक फायदे

जर तुम्ही 80 ते 100 किलोमीटर वेगाने कार चालवली तर त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते,तसेच इंजिन ऑइल लवकर खराब होत नाही. त्याशिवाय तुम्हाला गीअर्स बदलण्याची आणि वारंवार ब्रेक लावण्याची गरज पडत नाही. कारवर पूर्णपणे नियंत्रण राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपघाताचा धोकाही कमी होतो. कारचे पार्ट लवकर झिजत नाहीत.