Samsung 5G Smartphone : व्वा! 108MP कॅमेरा असणाऱ्या ‘या’ 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 30 हजार रुपयांची सूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung 5G Smartphone : जर तुम्ही स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी सॅमसंग हा एक उत्तम पर्याय आहे. कारण आता Galaxy S22 Ultra 5G या फोनवर 30 हजार रुपयांची सूट मिळत आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला Amazon च्या Deal of the Day या सेलला भेट द्यावी लागणार आहे.

1,31,999 रुपये किंमत असणाऱ्या हा फोन 1,06,999 रुपयात विकत घेऊ शकता. तसेच यावर एक्सचेंज ऑफरसह इतर ऑफर मिळत आहेत. त्यामुळे तो आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. ही ऑफर काही वेळासाठी असणार आहे त्यामळे लवकरात लवकर हा फोन विकत घ्या.

जाणून घ्या फीचर आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.8-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला असून तो 1700 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. तसेच HDR10+ सह या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षण देखील आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असून यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर कंपनीने दिला आहे.

या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे असून यात 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 108-मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह दोन 12-मेगापिक्सेल कॅमेरे समाविष्ट आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 40-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी इन-बिल्ट SPen सह असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला फोनमध्ये 25W वायरलेस आणि 10W रिव्हर्स चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर काम करतो.