Yamaha Scooters : स्कुटरप्रेमींसाठी गुडन्यूज! दाखल झाली यामाहाची शानदार स्कुटर, मिळत आहे 68 kmpl चे मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yamaha Scooters : आता स्कुटरप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशात इंधनाचे दर वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रिय स्कुटर कंपनी Yamaha ने आपली नवीन स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनी यात 68 kmpl चे मायलेज देत आहे.

मायलेजमुळे कंपनी मार्केटमधील इतर स्कुटर कंपन्यांना साहजिकच कडवी टक्कर देईल. जर तुम्हाला ही नवीन स्कुटर खरेदी करायची असेल तर तुम्ही आता ती एकूण चार कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. इतकंच नाही तर कंपनी यात अनेक शानदार फीचर्स देत आहे.

मिळत आहे 21 लीटर अंडर सीट स्टोरेज

कंपनीकडून Yamaha Fascino 125 Fi Hybrid डिस्कमध्ये शक्तिशाली 125 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.2 PS पॉवर देत असून ते 10.3 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इतकेच नाही तर या स्कूटरमध्ये 21 लीटर अंडर सीट स्टोरेज देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्कूटर 68 kmpl चे शानदार मायलेज देत आहे. या स्कूटरमध्ये डीआरएल लाइट्स, मोबाइल कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ आणि शटर लॉक सिस्टम आहे.

उपलब्ध आहे एलईडी टेल लाईट, स्पीडोमीटर

कंपनीची ही स्कुटर 88,230 हजार रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध असणार आहे. सुरक्षेचा विचार केला तर यात कंपनीकडून डिस्क ब्रेक दिले जात आहेत. शिवाय यात ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही स्कूटर सायन ब्लू, मेटॅलिक ब्लॅक, विविड रेड आणि यलो कॉकटेल या चार स्मार्ट कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच यात अॅनालॉग ओडोमीटर, अॅनालॉग ट्रिपमीटर, अॅनालॉग इंधन गेज आहे. स्कूटरला एलईडी टेल लाईट, स्पीडोमीटर दिला जात आहे.