Tatkal Ticket : तुम्हीही घरबसल्या करू शकता कन्फर्म केलेले तिकीट तत्काळ बुक, त्यासाठी वापरा ‘ही’ पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tatkal Ticket : रेल्वेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे देशभरातील अनेक जण प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु, अनेकवेळा रेल्वेचे तिकिट कन्फर्म होत नाही. त्यासाठी आता रेल्वेकडून तात्काळ तिकिटाची सुविधा देण्यात येत आहे.

तुम्ही आता काही मिनिटांत कन्फर्म केलेले तत्काळ ट्रेनचे तिकीट स्वतः बुक करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आता घरी बसून कन्फर्म केलेले तिकीट तत्काळ बुक शकता. त्यासाठी काही टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.

बुक करण्यापूर्वी जरूर करा या गोष्टी :-

स्टेप 1

  • जर तुम्हालाही कुठेतरी प्रवास करायचा असल्यास तुमच्याकडे ट्रेनचे तत्काळ कन्फर्म तिकीट पाहिजे.
  • तर यासाठी तुम्हाला प्रथम IRCTC च्या अधिकृत पोर्टल http://www.irctc.co.in वर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागणार आहे.

स्टेप 2

  • यानंतर तुम्हाला ‘माय अकाउंट’ वर जा आणि ‘माय प्रोफाइल’ वर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर ‘यादी जोडा/बदला’ वर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता तुम्हाला तुमची सर्व प्रवाशांची माहिती येथे भरावी लागणार आहे.

असे करा तत्काळ ट्रेन तिकीट बुक

स्टेप 1

  • जर तुम्हाला तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करायचे असल्यास त्यासाठी आधी तुम्हाला आगमन आणि प्रस्थानाचे स्टेशन निवडावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला प्रवासाची तारीख निवडावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला झटपट पर्याय निवडून सर्च वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 2

  • आता तुम्हाला स्लिपर, एसी इत्यादींमधून कोणताही क्लास निवडावा लागणार आहे.
  • यानंतर, प्रवाशांची नावे भरण्यासाठी ‘Add/modify List’ मध्ये भरलेल्या नावांवर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पैसे भरावे लागणार आहे.
  • हे केल्यावर तुम्ही लगेच कन्फर्म ट्रेन तिकीट मिळवू शकता.