Jandhan Yojana : खात्यात एक रुपयाही नसताना काढू शकता 10 हजार रुपये, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jandhan Yojana : 2014 मध्ये सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. या योजनेला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. लाखो गरीब कुटुंबीयांनी या योजनेअंतर्गत बँकांमध्ये खाती उघडली आहे.

त्यामुळे त्यांना खात्यात एक रुपयाही नसताना 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतात.जर तुम्हीही अजूनही खाते उघडले नसेल तर आजच अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

केंद्र सरकार आता जन धन खातेधारकांसाठी मोठी पावले उचलत आहे. जर तुमचेही जन धन खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण आता सरकार या लोकांना 10,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी सहज अर्ज करू शकता.

मिळतात अनेक फायदे 

सरकारकडून या योजनेशी निगडीत लोकांसाठी अनेक योजना चालवल्या जात असून तुम्ही त्याचा आरामात फायदा घेऊ शकता. त्यासाठी काही अटी आहेत.

योजनेअंतर्गत रुपे डेबिट कार्ड दिले जाते. त्याद्वारे तुम्ही 10,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टसाठी बँकेकडे अर्ज करू शकता. त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात येतील.

तसेच तुम्हाला 1 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळत आहे. सामान्य परिस्थितीत मृत्यू झाला तर 30,000 रुपये कव्हर रक्कम देण्यात येते.

ही खाते थेट लाभ हस्तांतरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सूक्ष्म युनिट्स विकास आणि पुनर्वित्त एजन्सी बँक योजनेसाठी पात्र मानली गेली आहेत.

गरजेची आहेत ही कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • लायसन्स
  • मतदार आयडी
  • पासपोर्ट
  • नरेगा राजपत्रित अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले जॉब कार्ड जारी केले जाते.