PM Ujjwala Yojana : तुम्हालाही मिळेल मोफत गॅस सिलिंडर, फक्त अशाप्रकारे करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Ujjwala Yojana : आपल्या देशात अजूनही अशा काही महिला आहेत ज्या दररोज चुलीवर स्वयंपाक करत आहेत. देशातील महिला मोठ्या प्रमाणावर सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचा लाभ घेत आहेत. त्याचा त्यांना फायदाही होत आहे.

तर काही महिलांना या योजनेबद्दल माहिती नाही त्यामुळे त्याचा त्यांना कसलाच फायदा होत आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. तुम्ही या योजनेस पात्र झाला तर तुम्हालाही मोफत गॅस सिलिंडर मिळेल.

तुम्ही आता सरकारच्या या योजनेत सहज अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmuy.gov.in/index.aspxला भेट द्यावी लागणार आहे.

तुम्ही ही वेबसाइट उघडल्यानंतर, अर्ज करण्यासाठी पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्या ठिकाणी तुम्हाला HP, Indane किंवा Bharat Gas मधून कोणताही एक वितरक निवडावा लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचे आवश्यक असणारे तपशील प्रविष्ट करावे लागणार आहेत. हे लक्षात ठेवा की तुमचा तपशील काळजीपूर्वक भर. त्यात कोणतीही चुकीची टाकू नका. तपशील भरल्यानंतर, वेबसाइटवर आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा. तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन मिळेल.

समजा जर तुम्ही सरकारच्या या योजनेत अर्ज दाखल करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारी कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.