file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. बिबट्यांचा वाढता वावर पाहता नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नागरिक हे दहशतीखाली वावरू लागले आहे.

दरम्यान अशीच काहीशी परिस्थिती सध्या नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात पाहायला मिळते आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे.

गुंडेगाव येथे ८५० हेक्टरवर वनक्षेत्र असून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा येथे वावर कायम असतो. वनक्षेत्राच्या लगत सध्या शेतीकामे सुरू झाली आहेत.

त्यातच शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतीकामात व्यत्यय येत असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी गुंडेगाव येथील शेतकऱ्यांनी केल आहे.