ॲड्रेस प्रूफशिवाय ‘या’ लोकांना मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या UIDAI ने कोणासाठी केला नियममध्ये बदल……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar update :- आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय सरकारी योजनांपासून शाळेत प्रवेश घेणे खूप कठीण झाले आहे.

दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले की, आता घराचा पूर्ण पत्ता नसला तरी आधार कार्ड जारी केले जाईल. हा बदल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी (सेक्स वर्कर) करण्यात आला आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी नियमांमध्ये बदल –
UIDAI ने सेक्स वर्करच्या सोयीसाठी नियम बदलले असून याबाबतची माहिती सुप्रीम कोर्टातही दिली आहे. UIDAI ने सांगितले की, सेक्स वर्करना आधार कार्ड बनवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पत्त्याच्या पुराव्याशिवाय आधार कार्ड उपलब्ध होईल –
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्करना आधार कार्ड जारी केले जाईल. त्यांना आधार कार्डसाठी घरचा पत्ता विचारला जाणार नाही.

UADA हे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे सेक्स वर्करना जारी केलेल्या प्रमाणपत्रांना मान्यता देईल.

म्हणजेच आता सेक्स वर्करना ॲड्रेस प्रूफशिवाय आधार कार्ड मिळणार आहे. सर्वांसाठी आधार कार्ड उपलब्ध करून देण्याच्या दिशेने UIDAI चे हे मोठे पाऊल आहे.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्‍या अंतर्गत येणारा विभाग आहे. ही संस्था सेक्स वर्कर्सचा डेटाबेस ठेवते.

यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती –
सोमवारी UIDAI ने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात माहिती दिली होती. सेक्स वर्करना सामाजिक सुरक्षा लाभ देण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान UIDAI ने प्रस्तावित प्रोफॉर्मा सादर केला होता.