Budhaditya Rajyog 2024 : जून महिन्यात ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. या महिन्यात मंगळ, सूर्य, बुध, गुरू आणि शनि आपल्या चाली बदलतील. या दरम्यान ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध सुद्धा मिथुन राशीत एकत्र ऐटीत, ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह 14 जूनला मिथुन राशीत प्रवेश करेल तर 15 जून रोजी मिथुन राशीमध्ये सूर्य गोचर होईल आणि बुधादित्य राजयोग तयार होईल. ज्याचा फायदा काही राशींना होईल, कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मिथुन
बुध, सूर्य आणि बुधादित्य राजयोगाचा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचे संपादन होऊ शकते. जुन्या आजारापासून आराम मिळेल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे बेत पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबातील संबंध सुधारतील.
कुंभ
सूर्य-बुध युती आणि राजयोग तयार होणे कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल, अनेक नवीन स्रोत उघडतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कन्या
बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे आणि बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे लोकांना विशेष लाभ होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदारांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येईल. पगारवाढीसह तुम्हाला बढती मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या इच्छा पूर्ण होतील.