मोहरी, शेंगदाणे की रिफाइंड तेल? AIIMS डॉक्टरांनी सांगितले कोणते तेल आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित

Published on -

Health Tips : मोहरी, शेंगदाणे की रिफाइंड तेल? AIIMS डॉक्टरांनी सांगितले कोणते तेल आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित आपल्या दैनंदिन आहारात तेलाचा वापर टाळता येत नाही. स्वयंपाकातील चव वाढवण्याबरोबरच तेल शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचेही काम करते.

भारतातील बहुतांश घरांमध्ये मोहरीचे तेल, शेंगदाण्याचे चे तेल किंवा विविध प्रकारचे रिफाइंड तेल वापरले जाते. मात्र नेमके कोणते तेल आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत AIIMS च्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मोहरीचे तेल – आरोग्यासाठी फायदेशीर पर्याय

आयुर्वेद तसेच आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार मोहरीचे तेल हृदयासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. या तेलामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिडचे संतुलित प्रमाण असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

तसेच हे तेल रक्तवाहिन्यांमधील साचलेले चरबीचे थर कमी करते. मोहरीच्या तेलात ग्लुकोसाइनोलेट नावाचे घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याचा स्मोक पॉइंट जास्त असल्यामुळे डीप फ्रायिंगसाठीही हे तेल सुरक्षित मानले जाते.

शेंगदाण्याचे तेल – चवीसोबत पोषण

मोहरीच्या तेलाचा तीव्र वास आवडत नसेल, तर शेंगदाण्याचे तेल हा चांगला पर्याय आहे. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

शेंगदाण्याच्या तेलात ‘गुड फॅट’ जास्त असल्यामुळे ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच हे तेल तळणीसाठी स्थिर असल्याने स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

रिफाइंड तेल – सर्वात कमी सुरक्षित

रिफाइंड तेल हे या तिन्ही तेलांमध्ये सर्वात कमी सुरक्षित मानले जाते. रिफायनिंग प्रक्रियेत उच्च तापमान आणि रसायनांचा वापर केला जातो, त्यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात. सतत वापरामुळे शरीरात सूज वाढू शकते, ज्याचा परिणाम सांधेदुखी आणि हृदयरोगांवर होऊ शकतो. शिवाय, तेल वारंवार गरम केल्यास ट्रान्स फॅट तयार होण्याचा धोका वाढतो.

AIIMS डॉक्टरांचा सल्ला

AIIMS चे डॉ. अमरिंदर सिंग मल्ही यांनी सांगितले की, शरीराला सर्वात कमी नुकसान मोहरीच्या तेलामुळे होते. त्यांनी ‘कच्ची घानी’ (कोल्ड प्रेस्ड) तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दर महिन्याला तेल बदलून वापरणे (कधी मोहरी, कधी शेंगदाणे किंवा तिळाचे तेल) अधिक फायदेशीर असल्याचे त्यांनी नमूद केले. रिफाइंड तेलाचा वापर शक्यतो टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News