Mahashtami Sanyog 2023 : शारदीय नवरात्रीची महाष्टमी 22 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे. या दिवशी महागौरी मातेच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी कन्यापूजाही करतात. त्याचा उत्साह देशभर पाहायला मिळतो. यावेळची महाष्टमीची तारीख ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानली जात आहे. या दिवशी सवर्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. तर शनि कुंभ राशीत असल्यामुळे शशा राजयोग तयार होत आहे.
तब्बल 100 वर्षांनंतर असा योगायोग घडत असल्याचे बोलले जात आहे. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येणार आहे. दरम्यान, चार राशींसाठी हे सर्वात फायदेशीर मानले जात आहे. माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद या काळात तुमच्या सोबत असणार आहे. यावेळी जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येईल. या वर्षी महाष्टमीला कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील ते जाणून घेऊया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी 22 ऑक्टोबर हा दिवस शुभ राहील. या दुर्मिळ योगायोगामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नती होऊ शकते. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांना महाष्टमीच्या दिवशी फायदा होईल. तुमच्या करिअरमधील कोणतेही अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक अडचणी संपतील, नवीन मार्ग खुले होतील.
मीन
या दुर्गाष्टमीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांवर माँ दुर्गेचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल. नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकते. आजचा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.
कर्क
कर्क राशीसाठीही महाष्टमीचा दिवस उत्तम राहील. व्यवसायाशी संबंधित सहलीची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आजच्या दिवशी माता दुर्गेचा आशीर्वाद मिळेल. नवीन कामांना गती मिळेल, आज तुम्ही आनंदी राहाल.