Numerology : आयुष्यात आपल्या बळावर खूप यश मिळवतात “ही” लोकं; शनिदेवाची असते कृपा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप माहिती मिळते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. याच मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीचे राशीनुसार मूल्यमापन केले जाते, त्याच पद्धतीने जन्मतारखेच्या आधारे अनेक गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र या शाखेचा अवलंब केला जातो, ज्यामध्ये संख्यांच्या आधारे सर्व काही ठरवले जाते. एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी 0 ते 9 मधील मूल्ये महत्त्वाची मानली जातात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेचे अंक जोडले जातात तेव्हा जी बेरीज येते त्याला त्याचे मूलांक आणि भाग्यांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर त्याचा क्रमांक 8 असेल. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचा मूलांक कळू शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला मूलांक 8 नंबरच्‍या व्यक्तींबद्दल माहिती देणार आहोत. कसा असतो या व्यक्तीचा स्वभाव…

मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव

-आठवा क्रमांक हा शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो आणि त्याचा स्वामी शनिदेव आहे. यामुळे या लोकांवर शनीची कृपा नेहमी असते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते, त्यांच्या कामात शनीची बाधा कधीही येत नाही. किंवा शनीच्या साडेसातीचा परिणाम होत नाही.

-या मूलांकाचे लोक स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय असतात. त्यांना न्याय आवडतो आणि त्यानुसार त्यांचे जीवन जगणे त्यांना आवडते. या व्यक्तींना कपट वृत्ती आवडत नाही, हे व्यक्ती नेहमीची सत्याच्या बाजूने उभे असतात.

-मूलांक 8 असणाऱ्या लोकांनी त्यांच्या करिअरशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ विचार करावा कारण जर त्यांनी योग्य दिशेने वाटचाल केली तर ते खूप यशस्वी होतील. म्हणूनच हा निर्णय घेताना थोडा काळजीपूर्वक घ्यावा.

-शनि खूप हळू यश देतो. परंतु या मूलांकाचे लोक खूप मेहनती आहेत, म्हणून हळूहळू पण एक दिवस त्यांना प्रचंड यश मिळते, जे दीर्घकाळ टिकते. असे मानतात या लोकांना हळू का असेना पण यश नक्कीच मिळते.

-हे लोक वकिली आणि न्याय संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवतात. औषध आणि मानसशास्त्र ही क्षेत्रेही त्यांच्यासाठी यशस्वी आहेत आणि औषधी व्यवसायातही त्यांना चांगला नफा मिळू शकतो.

-या मूलांक क्रमांकाचे लोक नंतर प्राचीन ज्ञानात तज्ञ आणि सल्लागार म्हणून चांगली प्रतिष्ठा मिळवतील. घरबांधणीशी संबंधित कामच त्यांना जीवनात संपत्ती देते. एकूणच या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळते.