Surya Gochar : ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! लवकरच होणार सूर्यदेवाचे संक्रमण, जाणून घ्या डिटेल्स


तब्बल वर्षभरानंतर सूर्याची राशी बदलणार असून या महिन्यात सूर्य देव मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हे लक्षात घ्या की मिथुन राशीत सूर्याचे संक्रमण 1 वर्षानंतर होत आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Surya Gochar : मिथुन राशीमध्ये सूर्याचे संक्रमण तब्बल 1 वर्षानंतर होत आहे. येत्या 15 जून रोजी संध्याकाळी 06.29 वाजता सूर्यदेव मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच हे देखील लक्षात घ्या की 32 दिवस मिथुन राशीत राहिल्यानंतर सूर्य पुन्हा एकदा राशी बदलणार आहे.

त्यामुळे याचा चांगला परिणाम हा मिथुन राशीसोबत इतर राशींना होणार आहे. संक्रमणामुळे त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे नशीब बदलेल. तसेच या संक्रमणामुळे काही राशींना विशेष काळजीही घ्यावी लागणार आहे.

कुंडलीत सूर्याच्या बलामुळे व्यक्तीला उच्च स्थान आणि सन्मान प्राप्त होतो. ज्योतिषांच्या मतानुसार, सूर्य हा मेष राशीमध्ये उच्च तसेच तूळ राशीमध्ये दुर्बल मानला जातो. तसेच सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर पूर्णपणे परिणाम करू शकतो, परंतु काही राशीच्या लोकांसाठी ते खूप लाभदायक असणार आहे, त्यामुळे काही राशीच्या लोकांनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

1. मेष

मेष राशीच्या तिसऱ्या घरात सूर्याचे संक्रमण होणार असून या संक्रमणामुळे प्रवासाची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. इतर लोकांचे सहकार्य मिळेल. नवीन लोकांशी भेट होऊ शकते. तसेच आर्थिक आघाडीवर भरभराट होईल. कामात लाभ होऊन व्यवसायातही प्रगती होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले वागणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

2. सिंह

सूर्याचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या अकराव्या घरात होणार आहे. हे संक्रमण अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. सर्व कामांमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतात. राशींच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. यावेळी तुमच्याकडून शत्रूंचा पराभव होऊन तुम्हाला समाजातील मोठ्या लोकांचे सहकार्य मिळू शकते. समाजात मान-सन्मान मिळून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

3. कन्या

सूर्याचे हे संक्रमण दशम घरात होईल. राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. करिअरमध्ये उंची गाठली जाऊ शकते. तसेच नोकरीत पद आणि प्रतिष्ठा मिळेल. इतकेच नाही तर व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. कार्यक्षमतेत वाढ होऊन नवीन मित्रांचे सहकार्य मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की विश्वासात घेऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका.

4. कुंभ

सूर्याचे हे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांच्या पाचव्या घरात होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहणार असून प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढू शकते. राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. तसेच जोडीदारासोबत समन्वय चांगला राहील. त्यांना व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांसाठी हा काळ भाग्यशाली मानला जातो.

या राशीच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

तर दुसरीकडे, या संक्रमणादरम्यान मिथुन, कर्क, तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. त्यांचे प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते आणि जास्त प्रयत्न केले तरच यश मिळू शकते, त्यामुळे या काळात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे तसेच तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागणार आहे.