Vastu Tips: रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही कुणाला देऊ नका; नशीब आणि संपत्ती दोन्ही गमवाल!

Updated on -

Vastu Tips: भारतीय धार्मिक परंपरेनुसार, दिवसाचे प्रत्येक वेळेसाठी विशिष्ट नियम सांगितले गेले आहेत. या नियमांमध्ये रात्रीच्या वेळेस काही गोष्टी कोणालाही देणे टाळण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी विशिष्ट वस्तूंचा व्यवहार केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि घरातून सुख-समृद्धी हळूहळू निघून जाते.

भारतात आजही अनेक कुटुंबांमध्ये वडीलधारी मंडळी रात्रीच्या व्यवहारांबाबत नियम पाळण्याचा आग्रह धरतात. या नियमांमागे अंधश्रद्धा नसून, आयुष्यातील ऊर्जा व्यवस्थापन आणि नकारात्मक परिणामांपासून बचाव हा हेतू असतो.

पैसे किंवा संपत्ती

रात्री कोणालाही पैसे देणे हे अशुभ मानले जाते. अशा व्यवहाराने घरातील आर्थिक ऊर्जा कमकुवत होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होतो. उधारीचा व्यवहार विशेषतः सूर्यास्तानंतर टाळावा, कारण असे केल्यास हळूहळू घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.

मीठ

मीठ हे केवळ अन्नाचा स्वाद वाढवणारे घटक नाही, तर वास्तुशास्त्रानुसार घरातील स्थिरतेचे प्रतीक आहे. रात्री मीठ देणे हे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते आणि नात्यांमधील समतोल बिघडवू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मीठ देणे अथवा मागणे टाळावे.

झाडू

हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे रात्री झाडू देणे म्हणजेच लक्ष्मीला घराबाहेर काढण्यासारखे मानले जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणालाही झाडू देऊ नये. यामुळे घरातील संपत्ती आणि सौख्य कमी होऊ शकते.

दूध

दूध हे पवित्र आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. रात्री दूध देण्याने घरातील शांती आणि सौहार्द यावर वाईट परिणाम होतो असे मानले जाते. तसेच यामुळे तणाव, आरोग्याच्या तक्रारी आणि नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते.

कपडे

रात्री कपडे देणे किंवा घेणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. असेही मानले जाते की यामुळे अनावश्यक अडथळे आणि दुर्दैव आयुष्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!