आधार कार्डसंबंधी ‘हे’ काम करण्यासाठी फक्त शिल्लक राहिला एक आठवडा! नाहीतर….

Ajay Patil
Published:
aadhar card update

आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून आता जवळपास प्रत्येक शासकीय कामासाठी आधार कार्ड हे गरजेचे आहे. अगदी सिम कार्ड घेण्यापासून तर बँकेत खाते उघडण्यापासून  आधार कार्ड हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आधार कार्डवर थोडी जरी चूक असली तरी खूप मोठ्या प्रमाणावर त्रास समोर जावे लागते.

आधार कार्ड मध्ये बऱ्याचदा जन्मतारखेत चूक किंवा नावात बदल, मोबाईल नंबर अपडेट यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे नाहीतर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.

याकरिता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने  नागरिकांसाठी आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची संधी निर्माण करून दिली असून त्याची अंतिम मुदत 14 जून 2024 पर्यंत आहे.

 आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत आहे 14 जून 2024

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची शेवटची मुदत आता 14 जून 2024 पर्यंत वाढवले असून या मुदतीपर्यंत भारतीय नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करण्यासाठी आता दहा दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे 14 तारखेपर्यंत आधार अपडेट करून घेणे खूप गरजेचे आहे.

जर आपण या संबंधीची आधार नोंदणी आणि 2016 चे अपडेट नियम पाहिले तर नागरिकांनी त्यांचा ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा डॉक्युमेंटरी त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी अपडेट करणे गरजेचे आहे.

हे पाच आणि पंधरा वर्षाच्या मुलाच्या ब्ल्यू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमचे नाव तसेच जन्मतारीख/ वय, लिंग, मोबाईल नंबर तसेच ई-मेल, नात्याचा पुरावा इत्यादी लोकसंख्या शास्त्रीय माहिती अपडेट करू शकता.

 आधार कार्ड ऑनलाइन कशा पद्धतीने अपडेट करावे

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

2- या ठिकाणी गेल्यावर तुमची भाषा निवडावी व त्यानंतर माय आधार टॅब वर क्लिक करावे.

3- नंतर ड्रॉप डाऊन मेनू मधून आधार अपडेट करा हा पर्याय निवडावा.

4- हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर अपडेट आधार डिटेल्स ऑनलाइन हे पेज दिसते व त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करावे.

5- नंतर तुमचा यूआयडी क्रमांक आणि कॅपच्या कोड एंटर करावा व नंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा. पासवर्ड मिळवण्यासाठी ओटीपी पाठवावर क्लिक करावे.

6- ओटीपी आल्यानंतर तो टाकावा आणि लॉगिन वर क्लिक करा.

7- तुम्हाला जे अपडेट करायचे आहे तो पर्याय निवडावा उदाहरणार्थ यामध्ये तुम्ही नाव, पत्ता किंवा जन्मतारीख यापैकी अपडेट करायचा असलेला पर्याय निवडावा.

8- नंतर सबमिट करावे आणि डॉक्युमेंट अपलोड करावे. एकदा तुम्ही आवश्यक बदल केल्यानंतर सबमिट करा यावर क्लिक करावे आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करा.

9- नंतर सबमिट अपडेट रिक्वेस्ट वर क्लिक करा. तुमच्या विनंतीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून अपडेट विनंती क्रमांक म्हणजेच युआरएन क्रमांक प्राप्त होतो.

10-लॉगिन केल्यानंतर आधार कार्डची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.

 आधार अपडेट करण्यासाठी सोबत ठेवा ही कागदपत्रे

तुम्ही जेव्हा माय आधार पोर्टलवर तुमचे आधार कार्ड अपडेट कराल तेव्हा तुमच्यासोबत ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने..

1- ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारने जारी केलेले ओळखपत्र, मार्कशीट तसेच लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड

2- पत्त्याचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट( तीन महिन्यांपेक्षा जुनी असू नये), विज किंवा गॅस कनेक्शनची बिले( तीन महिन्यापेक्षा जुने नाही), पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सरकारने जारी केलेल्या आयडी कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe