महाराष्ट्र

मागण्यांसाठी कृषीसेवा चालकांचा बंदचा इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कृषी कायद्यात कृषी दुकानदारांसाठी जाचक अटी व नियम लागू करण्याचे ठरविले असून, हे कायदे लादू नयेत, या मागणीसाठी कृषिसेवा दुकानदारांनी आपली दुकाने दि. २ ते ४ नोव्हेंबर, या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

‘माफदा’ या संस्थेच्या अधीन असलेल्या श्रीगोंदा तालुका सिड्स पेस्टी अॅण्ड फर्टिडीलर्स असोशिएशने शासनाद्वारे प्रस्तावित कायद्यातील जाचक अटींच्या निषेधार्थ राज्यातील कृषी दुकाने दि. २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार हेमंत ढोकले तसेच तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांना देण्यात आले आहे. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल ढवळे, सचिव महेंद्र आळेकर, खजिनदार सागर कदम, उपाध्यक्ष किशोर भोस, महावीर पटवा, सुरेश रननवरे, अभिजित लबडे, अक्षय पिंपळे, संतोष डांगे, तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office