Bajaj Pulsar 220F 2023 : नवीन बजाज पल्सर 220F लॉन्च ! आकर्षक लुकसह जाणून घ्या किंमत, फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Pulsar 220F 2023 : जर तुम्ही बजाज Pulsar 220 चे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने आता चाहत्यांसाठी पुन्हा बाजारात Bajaj Pulsar 220F अपडेटेड वर्जनमध्ये लॉन्च केली आहे.

कंपनीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या बाइकची विक्री बंद केली होती. पण, प्रचंड मागणी पाहता बजाज बाईकने त्यात काही मोठे बदल करून ती पुन्हा एकदा बाजारात आणली आहे. जाणून घ्या याची वैशिष्ट्ये, किंमत आणि डिझाइन…

अपडेटेड वर्जनची किंमत किती आहे?

कंपनीने आपल्या बजाज पल्सरची अपडेटेड वर्जन भारतात एकाच प्रकारात सादर केली आहे, ज्याची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याची विक्री लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. बाजारात त्याची स्पर्धा Suzuki Gixxer SF आणि TVS च्या Apache RTR 180 सारख्या शक्तिशाली बाईकशी होईल.

बजाज पल्सर 220F 2023 ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अॅनालॉग डायल, फ्युएल लेव्हल इंडिकेटर, स्पीडोमीटर आणि डिजिटल स्क्रीनसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे.

यात सिंगल-चॅनल ABS सोबत फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स मिळतात. बाईकमध्ये 17-इंच अलॉयजचा वापर करण्यात आला आहे. तसेच, कंपनीने आपला जुना लुक कायम ठेवला आहे, ज्यामध्ये क्लिप-ऑन हँडलबार, स्प्लिट सीट आणि मागील बाजूस टू-पीस ग्रॅब रेलचा समावेश आहे.

बजाज पल्सर 220F 2023: इंजिन

इंजिनच्या बाबतीत, यात 220cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 20bhp पॉवर आणि 18.5 Nm टॉर्क निर्माण करते.

हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, या बाइकचे इंजिन नवीन BS6 फेज-2 RDE अपडेट करण्यात आले आहे. एकूणच, ही अपडेटेड बजाज बाईक तरुणांना खूपच पसंत पडणार आहे.