अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया ; वाचा कोण काय म्हटले ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली.

त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक केली. यावर आरोपांचे रण माजले आहे.

आता अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही या कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली.

अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24