Maharashtra News : राज्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रताप ढाकणे यांनी केले. शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस तथा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी कार्यकर्त्यांसह गाव चलो घर चलो, या अभियान सुरू केले असून, जोहरापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या अभियानात ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील जोहरापुर, हिंगणगाव ने, भातकुडगाव खामगाव, भायगाव, गुंफा, बक्तरपुर, देवटाकळी, या गावांतील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकरी, तरुण मित्र युवक, सुशिक्षित, बेरोजगारांशी संवाद साधला.
ढाकणे म्हणाले, राज्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या गोंधळामुळे आज शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, त्यामुळे मी पक्षीय राजकारण सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात दौरा सुरू केलेला आहे,
त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी समजावून घेतल्या. जो शेतकऱ्यांच्या पाठीशी अडचणीच्या काळात उभा राहील, अशा प्रामाणिक माणसांना साथ द्या, असे आवाहन केले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे पाटील, केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधवराव काटे सर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अण्णा पाटील दुकळे, घुमरे साहेब, रामदास बडे, अशोक वाघमोडे, दिनकरराव बडदे, आप्पासाहेब काकडे, राजेंद्र उगलमुगले, एजाजभाई काझी, सेवानिवृत्त तहसीलदार राजेंद्र दराडे, शंकर लोंढे, गोरक्ष लोढे, रमेश ढाकणे, महादेव जमध