दसरा मेळाव्यासाठी अखेर शिवसेना हायकोर्टात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान देण्यास मुंबई महापालिकेची चालढकल सुरूच असल्याने शिवसेनेने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेने ही रिट याचिका दाखल केली आहे.

ही याचिका थोड्याच वेळात प्राथमिक सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यावेळी सुनावणीची तारीख तातडीने मिळावी, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.