Maharashtra News : गणेशोत्सव काळात राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने, तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयातर्फे १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई,
पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध भागांतील पर्यटनाशी निगडित भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी, पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसेच वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाणार आहे.
महोत्सवांतर्गत ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे श्री गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन घडवणाऱ्या विशेष सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे