केडगावला एकाच ठिकाणी लागणार फटाक्यांचे स्टॉल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-   फटाका स्टॉलच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होते .

मात्र स्टॉलची परवानगी प्रक्रिया किचकट असल्याने प्रशासनाने यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी केडगाव फटाका संघटनेचे अध्यक्ष रमेश परतानी यांनी केली आहे .

केडगावमधील फटाका व्यवसायकांनी एकत्र येत फटाका संघटना सुरू केली असुन आता केडगावमध्ये नगरच्या धर्तिवर एकाच ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यात येणार आहे .

त्याचे भूमिपुजन रामदास महाराज क्षिरसागर व केडगाव प्रेस संघटनेचे अध्यक्ष समीर मन्यार यांच्या हस्ते झाले . यावेळी उद्योजक एकनाथ कोतकर , अतुल शिंगवी तसेच केडगाव प्रेसचे सचिव मुरलीधर तांबडे ,

पत्रकार भूषण देशमुख , योगेश गुंड , नितीन देशमुख , संजय गाडिलकर , ओंकार देशपांडे , बबन मेहेत्रे, अमित मन्यार, विक्रम लोखंडे , शुभम पाचारणे व फटाका संघटनेचे सदस्य उपस्थीत होते .

यावेळी परतानी म्हणाले की , कोरोनामुळे सगळेच व्यवसाय अडचणित आल्याने ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत . फटाका व्यवसायात मात्र परवानगी काढण्याची किचकट प्रक्रिया आहे

त्यात सुधारणा होऊन एक खिडकी योजना सुरू केल्यास सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील . फटाका संघटनेचे उपाध्यक्ष किरण गुंड यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24