अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारीत सेवा देणार्या बँक कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली असून, सदरील कर्मचार्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांना पाठविण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली.
बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सर्व बँक कर्मचारी आतापर्यंत विना तक्रार ग्राहक सेवा देत आहेत. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक बँक कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर काही कर्मचार्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव बँक, अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, अंबिका महिला सहकारी बँक,
शहर सहकारी बँक, कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांकडे कोरोना बाधित कर्मचारी यांना नुकसान भरपाई देण्याचे पत्रात म्हंटले आहे.
या आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या :- कोरोना बाधित कर्मचार्यांना उपचारासाठी तीन लाखापर्यंत वैद्यकिय खर्च बँकेतर्फे करण्यात यावा, कोरोनाबाधित सेवकाचामृत्यू मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 21 लाख रुपयाचा विमासुरक्षा मिळवा सेवकाच्या मृत्यूपश्चात अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नौकरी द्यावी प्रत्येक बँक सेवकाचा 5 लाखापर्यंत अपघाती विमा बँकेतर्फे काढण्यात यावा.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved