Maharashtra News : कबुतर पाळताय ? तुमच्या घराजवळ आहेत ? ही बातमी वाचा मग ठरवा काय करायचं…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News :कबुतरांची समस्या केवळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे व महाराष्ट्रापुरती नसून जगभरात त्यांचा उपद्रव आढळून येत आहे. स्वित्झर्लंड येथील बसेल युनिव्हसिर्टीने ‘कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम’ याबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार कबुतरांच्या विष्ठेत नऊ प्रकारचे जीवाणू, पाच प्रकारचे विषाणू आणि परजिवी आढळून येतात. यातील दहापेक्षा कमी घटक माणसांमध्ये संसर्ग पसरवू शकतात.

प्रतिकारशक्ती कमी असलेले, गंभीर आजार झालेल्यांना संसर्ग होऊन श्वसनाशी निगडीत आजार होण्याची शक्यता अधिक आहे. पक्षी हे पर्यावरणासाठी पूरक मानले जात असले तरीही कबुतरांची संख्या वाढणे मानवी आरोग्यास धोकादायक ठरते,

असा निष्कर्ष महाराष्ट्रातील कबुतरांवर अभ्यास करणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाने दिला होता या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील कबुतरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्यास धोक्याची घंटा असून इमारतीची मोकळी जागा, बाल्कनी, उंच इमारतीचे टेरेस, पाण्याच्या टाक्यांजवळील आडोसा, पॅराफिट भिंती, खिडक्या, एसीच्या बॉक्सवर या कबुतरांची वस्ती वाढत आहे.

कबुतरांच्या विष्टेचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथिल अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. पार्थिव शहा म्हणाले, ‘कबुतरांच्या पंखातून निघणाऱ्या फेदर डस्टमुळे अती संवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता असते.

धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून वेगवेगळ्या प्रकारच्या दीडशेहून अधिक प्रकारच्या अलर्जी मानवी शरीरात होतात आणि याला प्रतिबंध घातला नाही, तर दमा बळावण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा रुग्णांना सततचा सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो व याचे कारण कबुतरांची विष्टा असू शकते. कबुतरांच्या विष्ठेचा वास, त्यातून होणारे आजार तसेच पावसात कुजल्याने त्यात होणारे किडे असा त्रास लक्षात घेता कबुतरांना रोखणाऱ्या राहिवाशांनी सुरक्षित जाळ्यांचा आधार घ्यावा.

लहान मुले, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशांमध्ये कबुतरांची विष्टा संपर्कात आल्यास अॅलर्जीचे प्रमाण वाढते’ नागरिक कंटाळले कबुतरांच्या त्रासाला कबुतरांच्या संसर्गामुळे मुंबई आणि परिसरात न्यूमोनिया आणि फुफ्फुसांचे आजार बळावत आहेत.

त्यामुळे मुंबई व लगतच्या शहरातील नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळले आहेत. पक्षी पर्यावरणासाठी पूरक मानले जात असले तरीही कबुतरांची संख्या वाढणे मानवी आरोग्यास धोकादायक ठरते आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, २०१९ मध्ये हैद्राबाद पालिका प्रशासनाने लोकांना कबुतरांना अन्न देऊ नका असे आवाहन केले होते व अशेच आवाहन महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकांनी केलेले आहे.