Maharashtra Weather Forecast: राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर ! 2 जणांचा मृत्यू, ‘या’ भागासाठी अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast: सध्या राज्यातील काही भागात कडक उन्हाळा तर काही भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राज्यातील अनेक भागात तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच मराठवाड्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर , मुंबई-पुण्यासह राज्यातील विदर्भ, मराठवाडा भागात तापमानात वाढ झाल्यानंतर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक आणि नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला.

याआधी हिंगोली कनेरगाव नाका येथे भीषण उष्माघातामुळे चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मराठवाड्यात उष्माघाताने आतापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमायतनगरमध्ये 28 वर्षीय विशाल रामराव मादसवार याने शुक्रवारी दिवसभर शेतात काम केले.

घरी जेवल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. नातेवाइकांनी तरुणाला घेऊन तातडीने ग्रामीण रुग्णालय गाठले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संभाजीनगर जिल्ह्यातील अडूळ बुद्रुक येथे 38 वर्षीय तातेराव उर्फ ​​बंडू मदन वाघ यांचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाला.

हवामान खात्याने (IMD) एक-दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईत 32  ते 33 अंश सेल्सिअस आणि पुण्यात 41 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

हे पण वाचा :- 10 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह खेरदी करा iQOO 9T 5G ; जाणून घ्या भन्नाट ऑफर