New Tata Nexon : स्टायलिश लुकसह लॉन्च होणार नवीन टाटा नेक्सॉन, शक्तिशाली फीचर्ससह जाणून घ्या बदल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Tata Nexon : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सच्या कार खूप शक्तिशाली व सुरक्षित मानल्या जातात. यात टाटांची सर्वात चर्चेत असणारी कार ही टाटा नेक्सॉन आहे. ही कार सर्वात सुरक्षित कार मानली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार आता टाटा नेक्सॉन ही कार नवीन अवतारात लॉन्च होऊ शकते. या कारचा लूकही एकदम स्टायलिश दिला जाऊ शकतो. टाटा मोटर्स आपल्या नवीन नेक्सॉनवर बर्याच काळापासून काम करत आहे.

चाचणी दरम्यान ही कार अनेक वेळा स्पॉट झाली आहे. त्यामुळेच कंपनी लवकरच याला भारतीय बाजारात लॉन्च करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच या कारमध्ये मजबूत फीचर्स आणि जबरदस्त पॉवरट्रेन देखील दिली जाऊ शकते.

नवीन टाटा नेक्सॉन डिझाइन

नवीन Tata Nexon मध्ये एकूण कूपसारखी स्टाइल दिसेल. यात नवीन डिझाइन फ्रंट आणि रियर प्रोफाइल मिळतील. समोरच्या बाजूस डायमंड कट इन्सर्टसह दुहेरी भाग असलेली ट्विन-पार्ट ग्रिल, हेडलॅम्प आणि फ्लॅटर नोज़ या दोन्हींना जोडणारा वाइड एलईडी लाइट बार आहे.

नवीन टाटा नेक्सॉन वैशिष्ट्ये

कंपनी या कारमध्ये उत्तम फीचर्स देखील देऊ शकते. यात टच-सेन्सिटिव्ह हॅप्टिक बटणांसह नवीन सेंट्रल कन्सोल लेआउट, तसेच टॉगल स्विचसह नवीन टू-स्पोक, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील मिळेल.

यासोबतच 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, कनेक्टेड कार टेक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ड्राईव्ह मोड सिलेक्टर, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर यासारखे मस्त फीचर्स दिले जाऊ शकतात.

नवीन टाटा नेक्सॉन पॉवरट्रेन

टाटा मोटर्स या कारमध्ये दमदार इंजिनही देईल. यात 1.2 लीटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 125 PS पॉवर आणि 225 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. मात्र, कंपनीने या कारच्या किमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. यासोबतच या कारचे डिझाईनही खूपच प्रभावी असणार आहे.