Planting lemon grass : शेतकऱ्यांनो ! ‘या’ पिकाची लागवड करून व्हा श्रीमंत, मिळेल लाखोंचे उत्पन्न; जाणून घ्या लागवडीविषयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Planting lemon grass : जर तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतात सध्या शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अशा वेळी आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन पीक घेऊन आलो आहे.

आपल्याला जर कमी गुंतवणूक करून चांगला बिजनेस करायचा असेल तर या पिकाची लागवड तुमच्या फायदाची ठरू शकते. हा व्यवसाय लेमन ग्रास शेतीचा आहे. लेमन ग्रास ची शेती करून आपण मोठ्या प्रमाणात इन्कम उभा करू शकतो. शेती करण्यासाठी आपल्याकडे पंधरा ते वीस हजार रुपये असणे आवश्यक आहे.

शेती करत असताना या पिकाचे बिया एकदाच शेतामध्ये पेरल्या जातात. त्यानंतर वर्षभरातून चार वेळा हे पीक आपल्याला काढता येते. या गवताची लांबी ही सात फुटांपर्यंत वाढत असते.

हे गवत आपल्याला दर तीन महिन्यांनी कापावे लागते. हे गवत कापून मार्केटमध्ये विकले जाते. मार्केटमध्ये लेमन ग्रास च्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या पंधराशे रुपये लिटर प्रमाणे लेमन ग्रास चे तेल विकल जाते.

लेमन ग्रास पासून बनवण्यात येणारे तेल हे औषध कंपन्या, कॉस्मेटिक वस्तू, साबण हे बनवण्याकरिता वापरले जाते. या वस्तूंना मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे सुद्धा बाजारात चांगलीच मागणी आहे.

लेमन ग्रास ची शेती आपण कुठल्याही भागांमध्ये करू शकतो. विशेष म्हणजे दुष्काळी भागात सुद्धा याची जास्ती शेती करता येते. आपल्याला लेमन ग्रास चार शेती मधून एका हेक्टर क्षेत्रातून जवळपास चार लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळते.

शेतकऱ्यांसाठी लेमन ग्रास ची शेती करणे खूप फायदेशीर आहे तसेच एकदम सोपी सुद्धा आहे. लेमन ग्रास ची शेती करण्यासाठी आपल्याला प्रथम बेड तयार कराव लागतात. शेतामध्ये बेड तयार केल्यानंतर तयार बिया या बेडमध्ये लावले जातात.

बिया लावल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पाणी देणे गरजेचे असते. महिन्यातून एक वेळा अचूकपणे खताची तसेच कीटकनाशक फवारणी करावी लागते. फेब्रुवारी ते जुलै या महिन्यामध्ये लेमन ग्रास ची लागवड करणे अधिक फायदेशीर असते.

लेमन ग्रास ची लागवड केल्यापासून सुमारे सहा ते सात वेळा या पिकाची कापणी करता येते. वर्षातून तीन ते चार वेळेस हे पीक आपल्याला कापता येते.

लेमन ग्रास या पिकाची लागण केल्यापासून पहिल्या तीन ते पाच महिन्यात पहिली कापणी करावी लागते. आपल्याला एक एकर शेतामधून सुमारे पाच टनापर्यंत लेमन ग्रास चे उत्पादन मिळते. लेमन ग्रास लागवड ही आपण पंधरा हजार ते वीस हजार रुपयांत शेतामध्ये करू शकतो.

परंतु आपले जर बजेट असेल तर आपण दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून मशीन सेट शेतामध्ये बसू शकतो. लेमन ग्रास च्या लागवडी मधून आपल्याला नक्कीच फायदा होतो. 100 किलो लेमन ग्लास पासून किमान एक लिटर लेमन तेल तयार होते.

मार्केटमध्ये या तेलाची किंमत 1000 ते 1500 रुपये आहे. म्हणजेच आपल्याला पाच टन लेमन ग्रास पासून किमान तीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळते. बाजारामध्ये आपण लेमन ग्रास ची पाने विकूनही कमाई करू शकतो. अशाप्रकारे आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो.