या तालुक्यातील पथविक्रेत्यांना पंतप्रधान मोदींमुळे कर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  हातावर पोट असलेल्या व शहरात फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांचा कोरोना संकटामुळे आर्थिक डोलारा पूर्णतः कोलमोडला आहे.

बंद व्यवसाय पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील पात्र पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे कर्जवितरणास सुरवात झाली आहे.

कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा मार्केट विभाग यांच्या वतीने शहरातील पथविक्रेत्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले.

त्यात 1046 पथविक्रेत्यांची नोंदणी झाली. पात्र लाभार्थींना बॅंकेमार्फत प्रत्येकी 10 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास दर तीन महिन्यांनी सात टक्के व्याज अनुदानाचा लाभ कर्जदारांना मिळणार आहे.

76 लाभार्थींना कर्जवितरण शहरातील 451 पात्र लाभार्थींनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले. त्यांपैकी 116 प्रस्तावांना संबंधित बॅंकांनी मंजुरी दिली.

त्यांतील 76 लाभार्थींना कर्जवितरण करण्यात आले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment