अहमदनगरमध्ये शरद पवार येणार आणि मनसे करणार बॅनरबाजी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली , आंदोलन करण्यात आली, उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन

आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटल कडुन जवलपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात आले व हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटल ला दिले

परंतु या सर्व हॉस्पिटल नी या उपजिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत महानगरपालिकेने सुध्दा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित हॉस्पिटल वर केली नाही.

कोरोना आजारात गोरगरीब जनतेला बेड सरकारी रुग्णालयात मिळत नव्हते म्हणुन ना इलाजासत्व खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांना लाखो रुपयांचे बिले या खाजगी हाॅस्पिटल वाल्यानी वसुल केले शासनाने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे या हॉस्पिटल वाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लुटमार झाली.

त्यामुळे आम्ही मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्री यांना निवेदन पाठविले परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्ना कडे लक्ष दिले नसल्यामुळे रविवारी देशाचे सर्वोच्च नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख येत आहेत त्यांच्या हा खाजगी हाॅस्पिटल चा वाढीव बिलांचा प्रश्न मनसे ते येणार त्या मार्गावर ”पवार साहेब गोरगरीब जनतेची कोरोना आजारवरिल वाढीव बिलांची रक्कम परत मिळवुन द्या” असे बॅनर लावणार आहे.

पवार साहेबांमुळे गोरगरीब जनतेची वाढीव बिलांची रक्कम परत मिळेल अशी अशा आम्ही व्यक्त करतो त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहरध्यक्ष गजेद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येनार असुन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष्य मनोज राऊत महिला उपजिल्हा ध्यक्ष अॅड अनिता दिगे, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसेचे उपशहरअध्यक्ष,विभागअध्यक्ष व कार्यकर्ते नियोजन करनार आहेत..

व सर्व मनसेचे शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटुन या संदर्भात निवेदन सुध्दा देणार आहेत.अशी माहीती मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे. सदर बॅनर वर खाली दिलेल्या हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम मनसे बॅनर वर छापणार असल्याचे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलॆ आहे.

Leave a Comment