शिवसेनेच्या बोगस शपथपत्र प्रकरणी गुन्हे शाखेचा केला खुलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली शिवसैनिकांची हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केला होता.

मुंबईत छापा घालून अशी शपथपत्रे जप्त करण्या आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते. ही चौकशी पूर्ण झाली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसलयाचे चौकशीतून स्पष्ट आले आहे.

यामध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या २०० शपथपत्रांचाही समावेश आहे. ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता.

त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून आपला तपास सुरू केला होता. कोल्हापूरसह नाशिक, पालघर, अहमदनगर यासारख्या राज्यात पोलिसांची पथक दाखल झाले होते व तपास करण्यात येत होता.

कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रतयेकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आमच्या जबाबात सांगितलं आहे, असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.