उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार का?

Maharashtra news : राज्यातील सत्तांतरासंबंधी ११ जुलैला सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे. प्रत्यक्षात मात्र कोर्टात वेगळीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही.

सुट्टी संपून उद्यापासून नियमित कोर्ट सुरू होत आहे. मागील तारखा सुट्टीकालीन बेंच समोर झाल्या आहेत. आता त्या नियमित कोर्टात येणे अपेक्षित आहे. जर त्या उद्याच्या कामजात आल्या नाहीत, तर वकील त्या कोर्टासमोर आणू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनतर त्यावर केव्हा सुनावणी घ्यायची, याचा निर्णय दिला जातो. त्यावेळी तातडीची गरज म्हणून या याचिका दाखल झाल्या होत्या. आता त्यांची सुनावणी घेताना सध्याच्या परिस्थितीचा, कोर्टातील अन्य कामकाजाचा विचार केला जाऊ शकतो.