Mahindra XUV700 : महिंद्रा कंपनीने (Mahindra Company) आपल्या लोकप्रिय कार Mahindra XUV700 च्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा .

Mahindra XUV700 हे शक्तिशाली वैशिष्ट्यांसह (Features) येते. या SUV ची किंमत (Price) 13.18 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.58 लाख रुपयांपर्यंत जाते.

लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, महिंद्राने या वाहनाच्या निवडक व्हेरियंटच्या किमतीत थोडीशी कपात केली आहे. ते 6000 रुपयांपर्यंत स्वस्त करण्यात आले आहे. जाणून घेऊया कोणत्या व्हेरियंटवर नवीन किंमत लागू (New price applies to variants) होणार आहे

हे प्रकार स्वस्त झाले आहेत

अहवालानुसार, पेट्रोल इंजिन AX5 5S MT, AX5 7S MT, AX7 MT, AX5 5S AT, आणि AX7 AT मॉडेल्स आणि डिझेल इंजिन AX5 5S MT, AX5 7S MT, AX7 7S MT, AX5 5S AT, यांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

AX5 7S AT, AX7 AT आणि AX7 AWD AT प्रकारांवर लागू होईल. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने महिंद्रा XUV700 च्या व्हेरियंटनुसार वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केली.

AX3 मॉडेलवर मागील वायपर आणि डिफॉगर यापुढे उपलब्ध नाहीत. कंपनीने AX3 चे दरवाजे आणि बूट-लिडसाठी निवडक अनलॉक फंक्शन देखील काढून टाकले.

मजबूत वैशिष्ट्ये

महिंद्राची ही फीचर लोडेड कार आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 12 स्पीकर, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, बिल्ट-इन अलेक्सा आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या वाहनाचा प्रतीक्षा कालावधी सध्या 16 महिन्यांपर्यंत चालत आहे.