अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- माहेरुन तीन तोळे सोने व एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरी सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा सागर मोहिते असे या मयत विवाहितेचे नाव आहे.

ती सासरी नांदत असताना माहेरहुन तीन तोळे सोने व एक लाख रुपये आणावेत व पोळयाच्या सणाचे वेळी भरण्यासाठी लागणारे ८० हजार रुपये माहेरहुन घेऊन यावेत.

यासाठी तिचा वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ करुन तिला उपाशी ठेवून मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून तिचे अंगावरील दागिने काढून घेऊन पैसे न आणल्यास नांदायचे नाही, अशा धमक्या दिल्या.

या त्रासास कंटाळून पूजा हीने राहत्या घरी सोमवारी विषारी औषध सेवन केले. तिला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात व नंतर नाशिक येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याबाब विष्णु नामदेव कर्णिक यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर रघुनाथ मोहिते, रघुनाथ नामदेव मोहिते, सुवर्णा रघुनाथ मोहिते, पुजा रघुनाथ मोहिते व बबन दौलत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.