April Bank Holiday 2024 : तुमची देखील बँकेसंबंधित काही कामे राहिली असतील तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये विविध राज्यांमध्ये होणारे अनेक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
अशास्थितीत तुमचे बँकेचे काम राहू शकते. म्हणूनच बँकांच्या सुट्ट्या जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. तरी या काळात ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. एप्रिलमध्ये बँका कोणत्या तारखेला बंद राहणार आहेत पहा…
20 एप्रिल : गर्या पूजेनिमित्त आगरतळामध्ये बँका बंद राहणार आहेत.
21 एप्रिल : रविवार
27 एप्रिल: महिन्याचा चौथा शनिवार
28 एप्रिल : रविवार
1 मे 2024 : अनेक राज्यांमध्ये कामगार दिनाची सुट्टी.
5 मे : रविवार
सुट्ट्यांमध्ये कोणत्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल?
-बँक सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन सेवा वापरू शकतात, कारण UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही.
-युजर्स UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.
-तुम्ही तुमचे काम नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटद्वारेही करू शकता.
-बँका बंद असूनही, ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे सहजपणे पेमेंट करू शकतात.
-तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.