Multibagger Stocks : स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी उसळी, 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे गरम

Content Team
Published:
Multibagger Stocks

Multibagger Stocks : 2023 मध्ये, स्मॉलकॅप स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला होता. 2024 मध्येही काही स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. या शेअर्सनी वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कोणते आहेत ते शेअर्स पाहूया…

बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने गेल्या वर्षभरात 66 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याच वेळी, 2024 मध्ये आतापर्यंत 6.53 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असलेल्या वाढीमुळे अनेक बाजार तज्ञांना आश्चर्य वाटले आहे आणि ते या गुंतवणूदारांना सावधपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.

2024 मध्ये मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्मॉल कॅप शेअर्सच्या यादीत, Waari Renewable Tech चा स्टॉक पहिल्या स्थानावर आहे. यावर्षी आतापर्यंत या शेअरने 331 टक्के परतावा दिला आहे. आजही हा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह १७०८.२० रुपयांवर व्यवहार करत आहे.

2024 मध्ये स्प्राईट ऍग्रोच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत या स्टॉकने 250 टक्के परतावा दिला आहे. आज हा शेअर बीएसईवर 1.98 टक्क्यांच्या वाढीसह 27.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 4000 टक्के परतावा दिला आहे.

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सनीही गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 2024 मध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना 239 टक्के परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांना 51 टक्के, फेब्रुवारीमध्ये 42 टक्के आणि मार्चमध्ये 42 टक्के परतावा दिला.

TechEnvision Ventures Limited च्या शेअर्सनी देखील 2024 मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यावर्षी आतापर्यंत या शेअरची किंमत 223 टक्क्यांनी वाढली आहे. या शेअरची किंमत एका वर्षात 847 टक्क्यांनी वाढली आहे. आज हा शेअर बीएसईवर 2 टक्क्यांच्या वाढीसह 1710.90 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

क्राफ्टऑन डेव्हलपर्सच्या समभागांनी गेल्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 994 टक्के नफा दिला आहे. आज हा मल्टीबॅगर शेअर 1.98 टक्क्यांच्या वाढीसह BSE वर रु. 159.40 वर व्यवहार करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe