Business Success Story:- तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात अगोदर त्यासंबंधीची प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती तुमच्यामध्ये तयार होणे गरजेचे असते. एकदा ध्येय ठरवले तर ते ध्येय गाठण्यासाठी लागेल ती किंमत मोजण्याची देखील तयारी असणे तितकेच गरजेचे असते.
त्यानंतर साहजिकच ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणारे मेहनत आणि प्रयत्न, जोपर्यंत आपली ध्येय गाठता येत नाही तोपर्यंत अविश्रांत श्रम या गोष्टींना तितकेच महत्त्व असते. तसेच योग्य दिशेने प्रयत्न होणे ही देखील खूप महत्त्वाची बाब यामध्ये असते. जेव्हा या पद्धतीचा सगळा योगायोग जुळून येतो तेव्हा माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
अगदी या तत्वाला धरून प्रताप स्नॅक्स या स्नॅक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या स्थापनेचा विचार केला तर या कंपनीची एमडी आणि सीईओ हे अमित कुमत हे असून त्यांनी प्रचंड मेहनतीने ही कंपनी उभारली असून ती आता यशाच्या शिखरावर आहे.
कशी झाली प्रताप स्नॅक्स कंपनीची स्थापना?
अमित कुमत हे मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथील असून 1990 च्या दशकामध्ये जेव्हा ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना चिप्स बनवावी अशी कल्पना सुचली होती. या कल्पने मागे जर आपण पाहिले तर त्यांना स्वतःला डाळ आणि भातासोबत पापड खाण्याचे प्रचंड प्रमाणात सवय व आवड होती.
परंतु अमेरिकेमध्ये देसी पापड मिळणे कठीण होते. त्यामुळे ते चिप्स खाऊन पापड खाण्याची त्यांची आवड भागवत होते. कालांतराने त्यांनी अमेरिकेतून विज्ञान विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि काहीतरी वेगळे करावे या ध्यासाने ते भारतात परतले. परंतु इंदूरला जेव्हा ते आले तेव्हा त्यांना ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची होती ती त्यांना मिळाली नाही. शेवटी नाईलाजाने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कपड्याचे व्यवसायामध्ये मदत करायला सुरुवात केली.
परंतु कपड्याच्या दुकानात काम करत असताना त्यांनी इतर क्षेत्रांमध्ये देखील नशीब आजमावायला सुरुवात केली. 1996 ते 99 दरम्यान त्यांनी एसएपी नावाची प्रशिक्षण संस्था उघडली आणि रासायनिक रंगांचा व्यवसाय सुरू केला व त्याकरिता वेबसाईट देखील ओपन केली. परंतु या डॉट कॉम चा लवकरच फुगा फुटला आणि इतर व्यवसायांना देखील तोटा सहन करावा लागला. व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे त्यांच्यावर जवळपास 18 कोटींचे कर्ज झाले.
तेव्हाच्या परिस्थिती विषयी बोलताना अमित म्हणतात की त्यावेळी त्यांच्याकडे बसने प्रवास करण्यासाठी देखील एक रुपया नव्हता. कुठे जायचे असेल तर बसने जायचे की पायी जायचे याचा देखील त्यांना बऱ्याचदा विचार करावा लागला. परंतु तरी देखील न हरता त्यांनी स्नॅकच्या व्यवसायामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यासाठीचे मोठे पाऊल टाकले. परंतु खिशामध्ये एक रुपया नसताना 15 लाख रुपयांची गुंतवणूक कशी करावी हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता.
याकरिता त्यांनी त्यांचा भाऊ अपूर्व कूमत याचा मित्र अरविंद मेहता यांच्याशी संपर्क साधला. अरविंद मेहता हे रिअल इस्टेट मध्ये कार्यान्वित होते. तरी देखील त्यांनी स्नॅक्स व्यवसाय मध्ये पार्टनर होण्याचे मान्य केले व लखनऊमध्ये चीज बॉल बनवले व ते इंदोर आणि इतर लहान शहरांमध्ये त्याची विक्री करायला सुरुवात केली.
हा व्यवसाय चांगला सुरू असताना तिघांनी मिळून इंदूरमध्ये चिप्स निर्मितीचे युनिट सुरू केले आणि बटाट्याच्या चिप्स मोठ्या प्रमाणावर तयार करायला सुरुवात केली. 2006 ते 2007 मध्ये अमितच्या कंपनी येलो डायमंडणे पेप्सिको इंडियाच्या लोकप्रिय उत्पादन कुरकुरेशी स्पर्धा करण्यासाठी चुलबुले लॉन्च केले.
येलो डायमंड कंपनीचे हे यश पाहून 2009 मध्ये सुप्रसिद्ध जागतिक उपक्रम कंपनी सेकॉया कॅपिटल ने या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधला पण कुमत ब्रदर्स आणि मेहता यांनी संमती देण्यासाठी 18 महिने वाट पाहिली. नंतर या कंपनीत वेंचर फर्मने 3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीला नवीन मशीन विकत घेता आले आणि चिप्स, बटाट्यापासून इतर उत्पादने आणि नमकीन बनवायला कंपनीने सुरुवात केली.
आज काय आहे कंपनीची स्थिती?
त्यानंतर मात्र कंपनीने मागे वळून पाहिले नाही व यशाचे शिखर गाठत कंपनी पुढे पुढे जात राहिली. कंपनीने अभिनेता सलमान खानला आपला ब्रँड अँबेसिडर बनवले आहे. आपण 2017 मध्ये विचार केला तर या कंपनीचे शेअर्स एनएसईवर 33% प्रीमियम लिस्टिंग झाले होते.
प्रताप स्नॅक्सचे शेअर्स बीएससी वर 1270 रुपये प्रतिशेअर या दराने सचिबद्ध झाले होते व त्यांची इशू प्राईज 938 रुपये होती. विक्रीच्या बाबतीत कंपनी दावा करते किती दररोज 1.2 कोटींपेक्षा अधिक स्नेकची पाकीट विकते. या कंपनीचे सध्या 9 राज्यांमध्ये 14 ठिकाणी कारखाने आहेत. जर सध्या आपण या कंपनीचे मार्केट कॅप पाहिले तर ते 3 हजार 272 कोटी रुपये आहे.