DA Hike Update: केंद्र कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात 2 लाख 18 हजार! परंतु कसे? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधित असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला तर यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे भत्ता आणि वेतन आयोगाची स्थापना हे मुद्दे सध्या महत्त्वाचे आहेत. कारण हे मुद्दे महत्वाचे असल्याचे कारण म्हणजे यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाची निगडित आहे.

सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही वेतन, भत्ते आणि इतर लाभ दिले जात आहेत ते प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मिळत आहेत. तसेच महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात पाहिले तर नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढवून 42 वरून 46 टक्के इतका करण्यात आलेला आ

व ही करण्यात आलेली महागाई भत्त्यातील वाढ एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत नवीन वर्षामध्ये परत एकदा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि थकीत महागाई भत्त्याची रक्कम लवकरात लवकर दिली जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 केली जाऊ शकते महागाई भत्त्यात वाढ

या नवीन वर्षामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात परत एकदा वाढ केली जाईल अशी शक्यता आहे व त्यासोबतच केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक यांची बाकी असलेली 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम लवकरात लवकर जाहीर केली जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर ही 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम सरकारकडून दिली गेल्यास याचा लाभ देशातील एक कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच महागाई भत्त्याच्या अनुषंगाने पाहिले तर सरकारकडून प्रत्येक वर्षाला दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो व या महागाई भत्त्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू केले जात असतात. त्यामुळे यावर्षीची ही महागाई भत्त्यातील वाढ ही 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केली जाईल अशी देखील शक्यता आहे.

 महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांना कशी ठरेल फायद्याची?

सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करण्यात येत आहे व जर ही वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये देखील वाढ होईल असे देखील बोलले जात आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी महत्त्वाचा असलेला फिटमेंट फॅक्टर हा 2.60 वरून 3.0 पट वाढवला जाईल अशी शक्यता आहे.

असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या संदर्भातली मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून याबाबत नेमके काय निर्णय घेतला जाणार याबाबत अजून कुठलीही वाच्यता करण्यात आलेली नाही.

परंतु जानेवारी महिना सुरू होऊन जवळपास अर्धा महिना संपण्यात जमा आहे. त्यामुळे याबाबत कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी सरकारकडून लवकर काहीतरी गिफ्ट जाहीर केले जाऊ शकते असे देखील शक्यता आहे. या नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे व जर असे झाले तर ती वाढ 50% पर्यंत पोहोचेल. त्यामुळे नक्कीच याचा परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊन मूळ वेतन हे वाढणार असे म्हटले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता दिला जात आहे.

 मिळणार 18 महिन्यांची डीए थकबाकी?

जर सरकारकडून महागाई भत्त्याची रक्कम वाढवली गेली तर ही वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू केली जाणार आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून याबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टता अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. परंतु साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात याबाबतची घोषणा किंवा विचार केला जाऊ शकतो.

तसेच केंद्र सरकार 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील देणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून 2020 ते 2021 या कालावधीत डीए थकबाकीची रक्कम दिली गेली नव्हती व कर्मचाऱ्यांकडून सातत्याने ही थकबाकीची रक्कम मिळावी अशा पद्धतीची मागणी केली जात होती.

जर केंद्र सरकारच्या माध्यमातून ही  प्रलंबित महागाई थकबाकीची रक्कम देण्यात आली तर उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दोन लाख 18 हजार रुपये एवढी रक्कम जमा होईल व याचा लाभ देशातील एक कोटी  पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे येणारे दिवसात केंद्र सरकारकडून या दोन्हीही बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.