एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बँका देताय 9.60% पर्यंतचे व्याज

ज्या बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करतात त्या बँकांमध्ये एफडी करण्याला अनेकजण महत्व दाखवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आज आपण एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर भारतात फार पूर्वीपासून एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे. ज्या बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करतात त्या बँकांमध्ये एफडी करण्याला अनेकजण महत्व दाखवतात.

अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आज आपण एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची यादी

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका एफडी करणाऱ्यांना अधिकचा परतावा देतात. ही बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देते.

या एफडीवर बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना 9.10 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.60 टक्के व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणारी बँक आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या कर्जावर 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50 टक्के व्याज देत आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज देत आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.11 टक्के व्याज देत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सुद्धा आपल्या सामान्य ग्राहकांना 888 दिवसांच्या FD वर 8.50 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9 टक्के व्याज देत आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9 टक्के व्याज ऑफर करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe