भारतीय रेल्वेने आणले ‘हे’ सहल पॅकेज ; केवळ ‘इतक्याश्या’ पैशांत ‘ह्या’ठिकाणी फिरवणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- आपण कोरोना संकटाच्या काळात घरबसल्या बोअर झाले आहेत आणि आता फिरण्याचा विचार करीत असाल तर भारतीय रेल्वेने आपल्यासाठी एक खास पॅकेज आणले आहे.

या पॅकेज अंतर्गत आपण चार ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. यासह, आपण साबरमती आश्रमात देखील भेट देऊ शकाल. या पॅकेजची किंमत 8505 रुपये आहे.

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या म्हणण्यानुसार या पॅकेजचे बुकिंग सुरू झाले आहे. आयआरसीटीसी ‘भारत दर्शन’ टूर पॅकेज अंतर्गत 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत प्रवासी या ठिकाणी भेट देऊ शकतील.

प्रवाशांना या सुविधा मिळतीलः- ब्रेकफास्ट, लंच आणि रात्रीच्या जेवणासाठी शाकाहारी भोजन उपलब्ध असेल. लॉजमध्ये स्थानिक सहल आणि लॉजिंगची सोय केली जाईल. या सर्व व्यवस्था आयआरसीटीसीच करणार आहेत.

या ठिकाणांना भेट दिली जाईल:- ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन केले जाईल. या चार ठिकाणांव्यतिरिक्त प्रवाश्यांना द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती आश्रमात नेण्यात येणार आहे.

आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपण हे पॅकेज खरेदी करू शकता. याशिवाय 1800110139 हेल्पलाईन नंबरवर कॉल करून माहिती मिळू शकते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे पुन्हा ई-कॅटरिंग सेवा सुरू करणार आहे. ई-कॅटरिंग सेवा सध्या काही निवडक स्थानकांवर सुरू केली जात आहे. प्रवाशांना आता ट्रेनमध्ये प्रवास करताना गरमा-गरम मनपसंद आहार घेता येणार आहे. यासह प्रवाशांना एसी कोचमध्ये उशा व चादरी देखील देण्यात येणार आहेत.

Leave a Comment