SBI FD Interest Rates Hike : जर तुम्हाला मुदत ठेव म्हणजेच FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना मोठी बातमी दिली आहे. बँकेने नुकतीच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे, म्हणजे FD दरात वाढ केली आहे.
एसबीआयने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 15 जून 2024 पासून लागू झाले आहेत. आता SBI गुंतवणूकदारांना पूर्वीपेक्षा अधिक फायदा होणार आहे.
SBI ने ठराविक मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट (0.25 टक्के) वाढ केली आहे. बँकेने एक वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या FD वरील व्याज 180, 210 दिवस आणि 211 दिवसांसाठी वाढ केली आहे.
एसबीआयचे एफडी दर
7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के
46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के (SBI ज्येष्ठ नागरिक FD व्याज
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के (सर्वोत्तम SBI FD योजना)
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के (टॉप SBI FD गुंतवणूक योजना)