Real Estate: गुंतवणुकीसाठी प्लॉट चांगला की फ्लॅट, वाचा या दोघांमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Real Estate: समाजामध्ये आपण बऱ्याच व्यक्ती पाहतो की त्यांना गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून एखाद्या चांगल्या नजीकच्या शहरांमध्ये चांगले लोकेशन पाहून प्लॉट खरेदी करतात किंवा काहीजण सदनिका अर्थात फ्लॅटची खरेदी करतात. जर आपण रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीचा विचार केला तर कमीत कमी गुंतवणुकीतून अगदी कमी कालावधीमध्ये सुद्धा जास्त परतावा देण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.

बरेच जण जेव्हा प्लॉट घेतात तेव्हा तो लोकेशन पाहून घेतात आणि काही वर्षानंतर त्याला चांगला दर मिळाल्यास विकून चांगला परतावा देखील मिळवतात.परंतु बरेच जण गुंतवणूक करताना ती फ्लॅट मध्ये करावी की प्लॉट विकत घेण्यामध्ये करावी याबद्दल गोंधळात दिसून येतात. यामध्ये सगळ्यात अगोदर आपली गरज नेमकी काय आहे? ते ओळखणे फार गरजेचे आहे.

रियल इस्टेट मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा अनेक महत्त्वाच्या बाबी तपासून पाहणे खूप गरजेचे असते. यामध्ये विविध बाबी सांगता येतील. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये फ्लॅट आणि प्लॉट म्हणजेच सदनिका आणि भूखंडातील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत.

फ्लॅटमधील गुंतवणूक व तिचे फायदे आणि तोटे

1- पैसे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा- बऱ्याचदा जर आपण फ्लॅट खरेदी करतो व चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने त्यामध्ये गुंतवणूक करतो. परंतु फ्लॅटमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याचदा आपल्याला अपेक्षा असेल त्याप्रमाणे परतावा मिळेल याची कुठल्याही प्रकारची हमी देता येणार नाही. कारण फ्लॅटची खरेदी करताना ग्राहक अनेक बाबतीत खूप बारीक सारीक विचार करून खरेदी करतात. तसेच फ्लॅटचा मेंटेनन्स अर्थात देखभाल योग्य रीतीने ठेवणे गरजेचे असते. परंतु देखभाल जर योग्य रीतीने ठेवली गेली नाही तर अशा फ्लॅटच्या खरेदीसाठी ग्राहक जास्त उत्सुक दिसत नाहीत.

एखाद्या वेळेस एखाद्या फ्लॅटच्या लोकेशन परिसरामध्ये जर काही पायाभूत सुविधा उभ्या राहिल्यामुळे जर भाव वाढले तरी देखील ग्राहक मिळणे जिकरीचे होऊन जाते.

2- फ्लॅटची किंमत व तिची भूमिका- आपल्याला माहित आहेस की फ्लॅटची किंमत ही त्या फ्लॅटचा आकार, जागा, त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधा, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून त्या फ्लॅटचे लोकेशन या सर्व बाबी पाहून फ्लॅटची खरेदी केली जाते. उदाहरणच घ्यायचे झाले तर खरेदीदार हा त्या फ्लॅटच्या परिसरामध्ये बाजारपेठ, वाहतुकीच्या सोयी सुविधा, शाळा, दवाखाना इत्यादी महत्त्वाच्या बाबी पाहूनच फ्लॅटची खरेदी करतात. यापैकी जर काही बाबी या फ्लॅटच्या परिसरामध्ये नसतील किंवा त्यांचा अभाव असेल तर फ्लॅट घेण्यासाठी ग्राहकांमध्ये पाहिजे तेवढी उत्सुकता दिसून येत नाही.

3- बँक कर्ज- जर आपण एखाद्या जमिनीच्या तुलनेत घराचा किंवा फ्लॅटचा विचार केला तर त्या खरेदीसाठी बँक कर्ज देण्यासाठी जास्त प्रमाणात उत्सुक दिसून येतात. वाजवी अशा व्याजदरामध्ये बऱ्याच बँका खरेदीदाराला कर्ज उपलब्ध करून देतात. यामध्ये बँकाचे जे काही नियम असतात त्यांची पूर्तता जर ग्राहकांनी केली तर बँक कर्ज मिळणे सुलभ होते. त्यामुळे घर खरेदीचा मार्ग मोकळा होता.

5- फ्लॅट खरेदी मधील असलेले काही जोखमीचे भाग- बऱ्याचदा आपण जेव्हा फ्लॅट खरेदी करतो. परंतु सर्व प्रोसेस झाल्यानंतर देखील विकासक अर्थात बिल्डर कडून संबंधित फ्लॅटचा ताबा हा उशिरा मिळतो. त्यामुळे ताबा जर उशिरा मिळाला तर खरेदीदाराला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा तीन-चार महिने उशिरा फ्लॅट खरेदीदाराच्या ताब्यात येतो.

6- फ्लॅट एक उत्पन्नाचा चांगला स्रोत- फ्लॅटमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला एक चांगले उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. आपण घेतलेला फ्लॅट आपण करार करून भाडेतत्त्वावर देऊ शकतो. फ्लॅट भाड्याने देताना कायदेशीररित्या आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण केल्यानंतर तो भाड्याने दिला तर संबंधित मालक आणि भाडेकरू मध्ये चांगले संबंध निर्माण होतात आणि कायमस्वरूपी फ्लॅटमालकाला एक उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होतो.

7- फ्लॅटच्या किमतीत होणारी वाढ- जर आपण प्लॉटच्या किंवा जमिनीच्या तुलनेत विचार केला तर फ्लॅटच्या किमतीमध्ये जी काही वाढ होते ती धिम्या गतीने होते. फ्लॅटच्या ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये जर विकास जोरात होत असेल तर अशा ठिकाणी किंमत दुप्पट पर्यंत वाढू शकते. परंतु ज्या ठिकाणी फ्लॅट आहे किंवा तो शहरा बाहेर आहे व आवश्यक सोयी सुविधांचा त्या ठिकाणी अभाव असेल तर अशा ठिकाणी फ्लॅटला तुम्हाला अपेक्षा असेल तितकी किंमत मिळणे दुरापास्त होते.
प्लॉटमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे

1- गुंतवणूक कराल तर मिळणारा परतावा- प्लॉटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये एखादा भूखंड खरेदी करता येऊ शकतो. फ्लॅटच्या तुलनेमध्ये प्लॉटचा देखभाल खर्च खूप कमी असतो तसेच तुमच्या प्लॉटचे तुम्हाला संरक्षण करणे एवढेच काम करणे गरजेचे असते. घेतलेल्या प्लॉट जवळ जर एखादी बाजारपेठ किंवा महामार्ग रुंदीकरण अशा प्रकारची कामे सुरू झाली तर कमीत कमी कालावधीमध्ये प्लॉटच्या माध्यमातून मिळणारा नफा हा खूप जास्त असतो.

2- कमीत कमी किमतीत एक ते दोन प्लॉट घेणे शक्य- प्लॉटची किंमत ही त्या प्लॉटचे लोकेशन, त्या ठिकाणाची वाहतुकीची सोय, आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची उपलब्धता यावर प्रामुख्याने अवलंबून असते. प्लॉट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला हव्या त्या आकारमानात तुम्ही तो घेऊ शकतात. परंतु त्या तुलनेत फ्लॅट खरेदी करताना तुम्हाला जागेची मर्यादा येते. याउलट प्लॉट खरेदी करताना जागेला मर्यादा नसते. त्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये एक ते दोन प्लॉट खरेदी करून तुम्ही कमीत कमी किमतीत खूप मोठी जागा खरेदी करू शकता.

3- प्लॉटच्या बाबतीत बँकांची कर्ज देण्याची मनस्थिती- जर आपण फ्लॅट च्या तुलनेत विचार केला तर प्लॉटला अर्थात भूखंड खरेदी करण्यासाठी बँक कर्ज देण्यासाठी हव्या त्या प्रमाणात उत्सुक दिसत नाहीत. यामध्ये काही सहकारी बँका जमीन खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु त्यावरील प्रक्रिया शुल्क आणि घेतलेल्या कर्जावरील व्याजाचे आकारणी ही होमलोनच्या तुलनेत विचार केला तर खूप जास्त असते. तसेच काही सहकारी बँका कर्ज मंजूर करताना त्या भूखंडाची किंमत किती आहे त्याच्या सरासरी 60 टक्के इतके कर्ज मंजूर करतात.

4- प्लॉट खरेदी मधील जोखीम- बऱ्याचदा आपण पाहतो की जमीन किंवा प्लॉट खरेदी किंवा विक्री व्यवहारांमध्ये अनेक प्रकारचे वाद उफाळतात. बऱ्याचदा वर्षानुवर्ष अशी प्रकरणे हे न्यायालयात प्रलंबित राहतात. बऱ्याचदा कायदेशीर बाबी पूर्ण न करता विकले गेलेले मोकळे भूखंड वादाच्या कचाट्यात अडकतात व यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम बऱ्याच वर्षापर्यंत अडकून पडते.

बऱ्याचदा कमी किमतीमध्ये भूखंड मिळतात व या कमी किमतीच्या मोहात पडून जमीन खरेदी केली जाते व या ठिकाणी व्यक्ती फसतो. बऱ्याचदा विक्रेत्यांकडून एखाद्या प्लॉटची विक्रीसाठी जाहिरात केली जाते. परंतु या जाहिरातींना न बळी पडता व्यवस्थित सगळे कागदपत्रांची छाननी किंवा खात्री केल्याशिवाय आणि त्या बाबतीत वकिलांचा सल्ला न घेता कुठल्याही प्लॉटची किंवा जमिनीची खरेदी करणे टाळावे.

5- उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून प्लॉटची भूमिका- प्लॉटमधील केलेली गुंतवणूक तुम्हाला एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत किंवा साधन निर्माण करू शकेल असे नाही. जसा आपण फ्लॅट भाड्याने देऊ शकतो तसा तुम्हाला प्लॉट भाड्याने देता येत नाही. परंतु एखाद्या वेळेस तुम्ही घेतलेला भूखंडाची जागा जास्त असेल तर तुम्ही एखादा कार्यक्रम किंवा पार्किंगसाठी ती तुम्हाला भाड्याने देता येईल. परंतु या माध्यमातून तुम्हाला परमनंट असा इन्कम सोर्स निर्माण करता येणार नाही.

बऱ्याचदा आपण एखाद्या उद्योग किंवा एखाद्या बाबींसाठी प्लॉट भाड्याने देतो. परंतु बऱ्याचदा कालांतराने अशी व्यक्ती त्याचा ताबा सोडत नाहीत. बऱ्याचदा मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण केल्याचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामुळे याबाबतीत कायदेशीर मार्गांनी संबंधित खरेदीदाराला अधिक जागरूक राहावे लागते.

6- प्लॉटच्या बाबतीत भविष्यातील स्थिती- आपल्याला माहिती आहे की मोकळ्या प्लॉटला नेहमी चांगली मागणी असते. याकरिता देखभाली वरचा खर्च हा शून्य असल्यामुळे खरेदी करताना दिलेल्या किमती व्यतिरिक्त गुंतवणूकदाराला कुठल्याही प्रकारचा अन्य खर्च करावा लागत नाही. भविष्यामध्ये जर बाजाराची परिस्थिती पाहून जर मोकळा प्लॉट किंवा भूखंड विकला तर त्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो. किंवा एखाद्या ठिकाणी कमीत कमी किमतीमध्ये चांगली जागा घेता येऊ शकते.