ITR 2 Filing : करदात्यांनो.. ITR 2 फाइल करत असाल तर सोबत ठेवा ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे, येणार नाही कोणतीच अडचण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITR 2 Filing : आयकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी ऑफलाइन ITR-2 फॉर्म जारी करण्यात आला आहे. तसेच तुम्ही वेबसाइटवर ITR 2 फॉर्म भरू शकता.

दरम्यान ITR-2 फॉर्मसाठी पात्र असणारे सर्व करदाते ते प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करून त्यांचे आयकर रिटर्न भरू शकतात. परंतु ITR 2 फाइल करत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवावी लागणार आहेत. पहा त्यांची यादी.

कोणाला भरता येतो ITR 2 फॉर्म?

आयटीआर 2 फॉर्म व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब ज्यांचे उत्पन्न आहे त्यांच्या वतीने दाखल करण्यात येतो. परंतु ते कोणत्याही व्यवसायातून मिळत नाही. यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त कमावणारे लोक असतात. जे भांडवली नफ्यातून कमावत येत आहेत, जे एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून पैसे कमावत आहेत. तसेच जे परदेशातून पैसे कमावत आहेत तसेच पगार आणि पेन्शन असणारे लोक ITR 2 मध्ये येतात.

इतकेच नाही तर अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफा, सट्टेबाजीतून मिळणारे उत्पन्न, लॉटरीतून मिळणारे उत्पन्न मिळवणारे लोक हा फॉर्म भरतात.

आवश्यक कागदपत्रे

आयटीआर 2 दाखल करण्यासाठी खूप महत्त्वाची कागदपत्रे गरजेचे आहेत.

  • समजा तुमचे उत्पन्न पगारातून असेल तर, तुम्हाला फॉर्म 16 आवश्यक असणार आहे, जो तुमच्या नियोक्त्याकडून जारी करण्यात येतो. जर तुम्हाला मुदत ठेवी किंवा बचत बँक खात्यावर व्याज मिळाले असेल आणि त्यावर टीडीएस कापला गेला असल्यास तर तुम्हाला टीडीएस प्रमाणपत्राची गरज असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला Deductors द्वारे जारी करण्यात आलेले Forn 16A आवश्यक असणार आहे.
  • तुम्हाला पगारावरील टीडीएस आणि पगाराशिवाय टीडीएस सत्यापित करण्यासाठी फॉर्म 26AS गरजेचा आहे. फॉर्म 26AS ई-फायलिंग पोर्टलवरून डाउनलोड करण्यात येतो.
  • समजा तुमचा शेअर्समध्ये भांडवली नफ्याचा व्यवहार असेल तर, भांडवली नफ्याची गणना करण्यासाठी तुम्हाला एका वर्षात शेअर्स किंवा सिक्युरिटीजच्या भांडवली नफ्याच्या व्यवहारांचे सारांश किंवा नफा/तोटा विवरण करणे गरजेचे असणार आहे.
  • तसेच तुम्हाला व्याज उत्पन्नाच्या मोजणीसाठी बँकेचे पासबुक गरजेचे असणार आहे.
  • तुम्हाला चालू वर्षात कोणत्याही नुकसानीचा दावा करायचा असल्यास तुम्हाला त्याच्याशी निगडित कागदपत्रांची गरज असणार आहे.
  • तुम्हाला मागील वर्षाच्या नुकसानीचा दावा करायचा असल्यास तुम्हाला मागील वर्षाशी निगडित ATR-V ची प्रत गरजेची असणार आहे.
  • समजा तुम्हाला कलम 80C, 80D, 80G, 80GG अंतर्गत कर बचत कपातीचा दावा करायचा असल्यास त्या संबंधित कागदपत्रे किंवा पुराव्यांची गरज असणार आहे.
  • आयकर रिटर्न फॉर्म ITR 1 आणि ITR 4 पोर्टलवर 20 मे रोजी प्रीफिल करण्यात आलेल्या डेटासह ऑनलाइन मोडमध्ये सक्षम करण्यात आले होते. यापूर्वी 11 मे रोजी ITR 2 फॉर्म जारी केला होता. दरम्यान 26 मे रोजी CBDT ने फॉर्म 10A आणि 10AB भरण्याची तारीख 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.