Retirement Plan : सध्या अनेकजण वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. अशातच ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी निधी जमा करायचा आहे ते आता ईपीएफ, पीपीएफ आणि विपीएफ सारख्या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेची निवड करू शकतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व योजना गुंतवणुकीवर निश्चित परताव्याची हमी देत आहेत. इतकेच नाही तर त्यांना कर सवलतीचा लाभ देखील दिला जात आहे. परंतु गुंतवणुकीआधी या योजना जाणून घेतल्या पाहिजे. नाहीतर तुम्हाला अडचण येऊ शकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF ही एक सेवानिवृत्ती बचत योजना असून या अंतर्गत, कर्मचारी आणि नियोक्ता (कंपनी) दोघेही पगाराच्या संरचनेनुसार EPF मध्ये एक निश्चित रक्कम योगदान देतात. अशातच निवृत्तीपूर्वी या रकमेतून आंशिक पैसे काढता येत असून ज्यावेळी एखादी व्यक्ती सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत जाते त्यावेळी संपूर्ण कॉर्पस सोडण्यात येतो. EPF योजना कर-फायदेची असून पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती-केंद्रित बचत पर्याय म्हणून योग्य आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
PPF हा कर आकारणी कमी करत असताना लोकांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये योगदान देण्याची परवानगी देतो. या योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असून यात तुम्हाला काही ठराविक कालावधीनंतर पैसे काढता येतात. हा गुंतवणुकीचा पर्याय पगारदार तसेच नॉन-पगारदार अशा दोन्ही व्यक्तींना असतो.
ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी
स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी अर्थातच VPF अंतर्गत, तुमचे मासिक योगदान निश्चित करण्यात येते. तसेच कर्मचारी या योजनेत रक्कम योगदान देऊ शकतात. समजा एखाद्याला जास्त बोनस किंवा इतर उत्पन्न मिळाले तर, ते त्यांच्या निवृत्ती योजनेत ती रक्कम जोडता येतात. समजा जर तुम्ही पाच वर्षांनी पैसे काढल्यास कोणताही कर कापला जात नाही.
अशा प्रकारे, EPF आणि VPF दोन्ही समान आहेत. तसेच VPF व्यतिरिक्त तुम्हाला भविष्य निर्वाह निधीमध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याची परवानगी मिळते. तर दुसरीकडे, PPF ला लॉक-इन कालावधी असून तुम्ही सहज पैसे काढू शकता. दरम्यान EPF आणि VPF अंतर्गत मिळणारे व्याज आणि ते अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर दिला जात नाही.
तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमाल मर्यादा ५ लाख रुपये इतकी आहे. परंतु, जर व्याज या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ते इतर स्त्रोतांच्या मुख्य उत्पन्नाच्या अंतर्गत करपात्र असते. तसेच हे लक्षात घ्या की PPF वर दिले जाणारे व्याज करपात्र नाही. हे सर्व पर्याय कमी जोखमीचे आहेत.