Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी, 1 लाख रुपयांच्या FD वर मिळत आहे ‘इतका’ व्याज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizen : बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांचे पैसे एफडीमध्ये गुंतवणे पसंत करतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. आणि त्यावर निश्चित व्याज दर मिळते. अशातच तुम्हीही तीन वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही काही बँकांच्या ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत, ज्या तीन वर्षांच्या एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहेत. येथे तुम्ही 1 लाख गुंतवून तीन वर्षात 26,000 हजरा पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के दराने व्याज देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देत आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.26 लाख रुपये होईल.

ॲक्सिस बँक

ॲक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के दराने व्याज देत आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

एचडीएफसी बँक

HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर ७.२५ टक्के व्याज देत आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्के दराने व्याज देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.

इंडियन बँक

इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ६.७५ टक्के दराने व्याज देत आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये होईल.

भारतीय रिझर्व्ह बँक

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची उपकंपनी, 5 लाखांपर्यंतच्या FD वर गुंतवणूक हमी प्रदान करते. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा आहे की मुदत ठेवीमध्ये तुमची 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.