Small Cap Stocks : छोट्या स्टॉकचा मार्केटमध्ये धुराळा, गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा…

Content Team
Published:
Small Cap Stocks

Small Cap Stocks : स्टॉक मार्केटमध्ये अनेक स्मॉल-कॅप स्टॉक्स आहेत ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. काही 10 स्मॉल-कॅप शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 100 पट अधिक परतावा दिला आहे.

असाच एक मल्टीबॅगर शेअर म्हणजे Waaree Renewable Technologies Ltd आहे. या शेअरचा दबदबा अजूनही मार्केटमध्ये कायम आहे आणि मंगळवारी तो 5 टक्केच्या वरच्या सर्किटला धडकला.

Waari Renewable Technologies च्या शेअर्सनी 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना धक्कादायक परतावा दिला आहे. 23 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 2624.15 रुपयांवर बंद झाले. बरोबर 5 वर्षांपूर्वी 22 एप्रिल 2019 रोजी हा शेअर 3.76 रुपयांच्या पातळीवर होता. अशा प्रकारे, 5 वर्षांच्या कालावधीत स्टॉकमध्ये अंदाजे 670 पट वाढ झाली आहे.

जर आपण रकमेवर नजर टाकली तर वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजमध्ये पाच वर्षांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 6.70 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. 2023 या आर्थिक वर्षात कंपनीला 55.42 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर आर्थिक वर्ष 2019 मध्ये 1.91 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

Waari Renewables Technologies Ltd ने डिसेंबर 2023 तिमाहीत 324.7 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. 2022 च्या डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा 25.1 कोटींवरून दुप्पट होऊन 64.5 कोटी झाला.

डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा वाढून 87.8 कोटी रुपये झाला. कंपनीबद्दल बोलायचे झाले तर ती संगम रिन्यूएबल्स लिमिटेड म्हणून ओळखली जाते. ही वारी ग्रुपची उपकंपनी आहे आणि सोलर ईपीसी व्यवसायात सक्रिय आहे. वारी समूहाने एकूण 600 मेगावॅट क्षमतेच्या 10000 सौर प्रकल्पांवर काम केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe