Success Story :- बरेच शेतकरी अथक मेहनतीच्या जोरावर आणि व्यवस्थित नियोजनातून अतिशय अवघड परिस्थितीमध्ये देखील विविध प्रकारचे फळबागा आणि पिके यशस्वी करतात. यामागे त्यांचा कष्ट, त्या त्या पिकांसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबी आणि वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण करणे इत्यादी बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. तसेच शेतीमध्ये प्रयोगशीलतेला खूप मोठा वाव असून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतकरी करत असल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे आपल्याला दिसून येते.
याच गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे देखील आता शेतीमध्ये भरपूर उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. तसेच परंपरागत पिके आणि शेती पद्धती आता नाहीसी झाली असून त्याऐवजी आता तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पिके यशस्वी केली जात आहेत. खडकाळ जमिनीवर देखील आता फळबागा यशस्वी केल्या आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील तांदळी वडगाव येथील रमेश ठोंबरे या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंबाची बाग फुलवली आणि त्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न देखील घेतले आहे.
रमेश ठोंबरे यांची यशोगाथा
पारंपारिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन प्रयोग करावा या उद्देशाने रमेश ठोंबरे यांनी नियोजन केले. स्वतः ते प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या शेतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांचा प्रयोग केला आहे. परंतु डाळिंबा करीता त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने मिळेल या गोष्टीवर सगळा भर दिला व त्याच पद्धतीने डाळिंबाचे नियोजन केले. तांदळी वडगाव या शिवारामध्ये त्यांची वडीलोपार्जित साडेतीन एकर जमीन असून या क्षेत्रावर त्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे.
एका एकरकरता त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला असून या बागेतून अगोदर जे काही उत्पादन त्यांना मिळाले ते त्यांनी बांगलादेश या ठिकाणी निर्यात केले. डाळिंबावर रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काम करावे लागते. जर डाळिंब बागेवर कोणता रोग पडला तर त्याचा विपरीत परिणाम फळांवर होतो व फळांवर डाग वगैरे पडले तर त्याला भाव कमी मिळतो. फळावर ठिपके पडले तर डाळिंबाचा दर्जा खालावतो व त्याला बाजारात मागणी कमी होते.
त्यामुळे या दृष्टिकोनातून विशेष लक्ष देऊन फळबागेची काळजी घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. याविषयी माहिती देताना रमेश ठोंबरे यांनी सांगितले की, जमीन खडकाळ होते म्हणून बाकीचे पिकांचे उत्पादन व्यवस्थित निघत नव्हते. त्यामुळे वडिलांनी या जमिनीवर डाळिंब पीक घेण्याचा सल्ला दिला व त्यातूनच खडकाळ जमिनीवर डाळिंबाची लागवड केली गेली. या बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. अशा पद्धतीने त्यांनी कष्टाच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब फुलवला व लाखोंचे उत्पन्न आता त्यांना मिळत आहे.