Fixed Deposit : तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर आज आम्ही तीन वर्षांच्या एफडी बद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकता.
तुमच्या माहितीसाठी FD तरलता प्रदान करते आणि नियमित व्याज उत्पन्न देखील देते. एफडीवरील व्याज करपात्र आहे. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहेत. आज आम्ही टॉप 10 बँकांच्या तीन वर्षांच्या एफडीवरील व्याज आणि 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा फायदा याबद्दल सांगणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजद: 7.75 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.26 लाख रुपये होतील.
ॲक्सिस बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.60 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.25 लाखांपर्यंत वाढतील.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.50 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.25 लाख रुपये होतील.
कॅनरा बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.30 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.24 लाख रुपये होतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.25 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.24 लाख रुपये होतील.
युनियन बँक ऑफ इंडिया
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.23 लाख रुपये होतील.
इंडियन बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर व्याजदर: 6.75 टक्के
तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.22 लाख रुपये होतील.