Best Investment Scheme:- पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येक गुंतवणूक योजना किंवा पर्यायांचे वैशिष्ट्ये देखील वेगळे आहेत. यामध्ये गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे आणि गुंतवणूक सुरक्षित राहील व कर बचत देखील होऊ शकेल अशा गुंतवणूक योजनांच्या किंवा पर्यायांच्या शोधामध्ये असतात.
तसे पाहायला गेले तर गुंतवणुकीच्या साठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. सरकारच्या माध्यमातून देखील अशा काही योजना आहेत की ज्याद्वारे तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात,तुमची गुंतवणूक सुरक्षित देखील ठेवू शकतात व कर देखील वाचवू शकतात. अशाच योजनांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
उत्तम परतावा आणि कर वाचवू शकतील अशा योजना
1- एससीएसएस अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजना- ही एक भारत सरकारची महत्त्वाची योजना असून ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रामुख्याने राबवली जाते व हा एक विषय उपक्रम आहे.
ज्येष्ठ नागरिकांना उत्तम व आणि सुरक्षित गुंतवणूक ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पर्याय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश असून या योजनेचा लाभ केवळ साठ वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती घेऊ शकतात. तसेच 55 वर्षांवरील जेष्ठ नागरिक जे सेवानिवृत्ती
किंवा स्वेच्छा निवृत्ती विशेष स्वयंसेवी योजनेअंतर्गत निवृत्त झालेल्या आहेत व त्यासोबतच नागरी संरक्षण कर्मचारी वगळता माजी लष्करी कर्मचारी असलेले पन्नास वर्षावरील जेष्ठ नागरिक म्हणजे जे कर्मचारी लवकर निवृत्त होऊ इच्छिता ते एससीएसएस भत्ता वापरू शकत नाहीत.
या विशेष पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेमध्ये तुमच्या ठेवीवर 8.20% व्याज मिळू शकते व किमान गुंतवणूक 1000 ते कमाल 30 लाख रुपयापर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये तुम्हाला आयकर नियम 80सी अंतर्गत दीड लाख रुपये पर्यंत कर सूट मिळू शकते.
2- पीपीएफ अर्था सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी – भारतातील अनेक पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये ही योजना ऑफर केली जाते व ही एक प्रसिद्ध अशी गुंतवणूक योजना आहे. ही योजना हमखास परतावा आणि त्यातून मिळणारे व्याज करमुक्त असण्याकरिता प्रसिद्ध आहे.
या योजनेचा परिपक्वता कालावधी पंधरा वर्षाचा असून ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये 7.1% व्याज दिले जाऊ शकते व या योजनेत केलेली गुंतवणूक ईईई श्रेणीत येते.
या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक व त्यावर मिळणारे व्याज आणि परिपक्वते नंतर मिळणारी रक्कम संपूर्णपणे करमुक्त आहे. यामध्ये देखील 80c अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत करसूट मिळू शकते.
3- एसएसवाय अर्थात सुकन्या समृद्धी योजना- ही सरकारी बचत योजना असून ती फक्त मुलींसाठी ऑफर करण्यात आलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचे आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य सुरक्षित करता येऊ शकते.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 8.1 टक्के दराने व्याज मिळते. एक आर्थिक वर्षामध्ये या योजनेतूनही 250 रुपये ते दीड लाख रुपये पंधरा वर्षासाठी गुंतवू शकतात. या योजनेत देखील 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करात सूट मिळते.
4- एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना- ही योजना नोकरदार लोकांसाठी असून ज्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर चांगली रक्कम हवी आहे असे व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहते. असे म्हटले जाते की ही योजना कर बचतीच्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक योजना असून यामध्ये तुम्हाला 80C आणि 80CCD(1B) अंतर्गत पन्नास हजार रुपयांची कर सूट मिळते.
तसेच तुम्ही तुमच्या या एनपीएस खात्यामधून जास्तीत जास्त ६० टक्के रक्कम काढू शकता आणि फंड तुम्हाला मानसिक पेन्शन देण्यासाठी डेट फंड मध्ये 40% रक्कम गुंतवतो.