स्वत:चे घर आणि स्वत:ची गाडी असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व ज्यांकडे पैशांचे बजेट कमी आहे ते लोक बँकांकडून कर्ज घेतात. जर तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल तर कोणती बँक सर्वात कमी व्याज दर देते किंवा कोणत्या बँकसानाचा व्याजदर किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे.
आजकाल बँका ग्राहकांना खूप कमी कागदपत्रांच्या पूर्ततेसह कार लोन देतात. तुम्हाला देखील सणासुदीच्या काळात कार घेण्याचा विचार असेल व लोन घेण्याचा मानस असेल तर आपण याठिकाणी तीन बँकांच्या लोन बाबत माहिती घेऊ. एसबीआय, पीएनबी आणि बीओबी या तीन मोठ्या बँकच रेट किती आहे किंवा इतर फी किती आहे हि माहिती पाहू. यामुळे तुम्हाला सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल याची माहिती मिळेल.
१ ) पीएनबी बँक :-पीएनबी बँक आपल्या ग्राहकांना कार लोनवर ८.७५ ते ९.६० टक्के व्याज आकारत आहे. जर तुम्ही पीएनबीकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतल व ते ५ वर्षांसाठी तुम्ही ईएमआय वर घेतलं तर तुम्हाला
दरमहा १०,३१९ ते १०,५२५ रुपये ईएमआय भरावा लागेल. या बँकेमध्ये कुठलीही प्रोसेसिंग फी नाही.
२ ) स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कार लोनचा दर ८.६५ टक्के ते ९.७० टक्के ठेवला आहे. समजा जर तुम्ही ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले तर ५ वर्षांचा मासिक हप्ता १०,२९४ ते १०,५५० रुपये होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही कर्ज प्रकिया करताना बँक कोणतेही शुल्क आकारत नाही.
३) बँक ऑफ बडोदा : ही बँक देखील कार लोन ऑफर करते. ही बँक देशातील मोठ्या बँकांपैकी एक आहे. या बँकेकडून कार लोनवर ८.७० ते १२.१० टक्के व्याज आकारले जाते. जर तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेत असाल तर तुम्हाला ५ वर्षांसाठी दरमहा १० हजार ३०७ ते ११ हजार १४८ रुपये ईएमआय भरावा लागेल.