file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचीही परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्या ठिकाणी घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊन राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कुलाबा वेधशाळेतील तज्ञांनी याविषयी माहिती दिली आहे.

राज्यात चक्रीवादळ धडकणार नसले तरी वाऱ्यांचा वेग अधिक असेल व पावसाचा मोठा तडाखा बसू शकतो, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

त्यामुळे सप्टेंबर संपता संपताच पाऊस पुन्हा राज्यात जनजीवन विस्कळीत करणार असल्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे.

२६ सप्टेंबरला ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त

सेच २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये २६, २७, २८ सप्टेंबरला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल.

काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मुख्य परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणामध्ये याचा परिणाम अधिक दिसण्याची शक्यता आहे.